निसर्ग संवर्धनात सिंधुदुर्ग अग्रेसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्ग संवर्धनात सिंधुदुर्ग अग्रेसर
निसर्ग संवर्धनात सिंधुदुर्ग अग्रेसर

निसर्ग संवर्धनात सिंधुदुर्ग अग्रेसर

sakal_logo
By

43978
माणगाव ः वृक्षारोपण प्रसंगी कुडाळ तालुका पत्रकार समिती व सामाजिक वनीकरण विभाग.

निसर्ग संवर्धनात सिंधुदुर्ग अग्रेसर

सुभाष पुराणिक ः माणगावात पत्रकार समितीतर्फे वृक्षारोपण

कुडाळ, ता. १८ ः राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सक्षम आहे. वृक्ष लागवडीसाठी वनविभाग नेहमीच येथील शेतकऱ्यांना मागणीच्या तुलनेत पुरवठा करू शकतो, असे प्रतिपादन वनविभागाचे विभागीय अधिकारी सुभाष पुराणिक यांनी माणगाव येथे केले. कुडाळ तालुका पत्रकार समिती व सामाजिक वनीकरण विभागातर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय येथे कुडाळ तालुका पत्रकार समिती व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी वनविभागाचे विभागीय अधिकारी सुभाष पुराणिक व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक गजानन केसरकर यांना रोप भेट देण्यात आले. तालुका पत्रकार समिती अध्यक्ष विजय पालकर, माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सगुण धुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी वि. न. आकेरकर, सचिव एकनाथ केसरकर, संचालक महेश भिसे, साई नार्वेकर, वनक्षेत्रपाल योगेश सातपुते, वनपाल श्रेया परब, बाळा गावडे, पत्रकार समिती उपाध्यक्ष रवी गावडे, खजिनदार अजय सावंत, जिल्हा प्रतिनिधी राजन नाईक, बंड्या जोशी, वैशाली खानोलकर, प्रमोद म्हाडगुत, नाना बोगार, चंदू शेडगे, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, प्राचार्य पवार आदी उपस्थित होते. संस्था सचिव केसरकर यांनी प्रास्ताविक केले. विजय पालकर यांनी आभार मानले.
--
माकडांचा उपद्रव चिंताजनक
यावेळी संस्था अध्यक्ष सगुण धुरी यांनी भातशेतीपेक्षा वनशेती फायदेशीर असून सध्या मोठ्या प्रमाणात माकडांचा उपद्रव होत आहे. वनविभागाने याबाबत योग्य उपाय योजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88121 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..