कळसूली प्रशालेत समूह गायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळसूली प्रशालेत समूह गायन
कळसूली प्रशालेत समूह गायन

कळसूली प्रशालेत समूह गायन

sakal_logo
By

कळसूली प्रशालेत समूह गायन
कणकवली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत कळसूली इंग्लिश स्कूलमध्ये देशभक्‍तीपर समुहगीत गायन स्पर्धा झाली. यात प्राथमिक गटातून सातवी वर्गाने प्रथम क्रमांक, पाचवी वर्गाने द्वितीय क्रमांक मिळविला. माध्यमिक गटातून अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक आणि नववी ‘ब’ वर्गातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. संस्थेचे चेअरमन के.आर. दळवी, सदस्य नामदेव घाडीगावकर, अंकुश परब, विश्वास दळवी, दिलीप दळवी, एम.डी. सावंत, शिक्षक पालक संघाचे शिवाजी गुरव, श्री घाडीगावकर श्वेता दळवी उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. पी. पवार नियोजन केले. एस. के. कावले, एस. एल. आर्लेकर आणि सी.एम. राणे यांनी परीक्षण केले. ए. जी. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत मेस्त्री यांनी हार्मोनियम साथ दिली. रूद्र यांनी ढोलकीसाथ, वेदांत गोसावी तसेच झांज वादक प्रशांत कासले, शाम लाड आदींनीही सहकार्य केले.