आरवली-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरवली-संक्षिप्त पट्टा
आरवली-संक्षिप्त पट्टा

आरवली-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

-rat१८p४.jpgः
L४३९३५
कुंभारखाणी बुद्रुक ः शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना कृष्णकांत सुर्वे.
--------------
कुंभारखाणीमध्ये शालेय साहित्य वाटप
आरवली ः संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील ग्रामोत्कर्ष संघ, मुंबई संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर शाळेत ७५ वा स्वातंत्र्यदिनी मुलांना शैक्षणिक साहित्य व गोड खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आले. तत्पूर्वी मुलांनी ढोलताशाच्या गजरात शाळा ते ग्रामपंचायत मार्गावर प्रभातफेरी काढली. माध्यमिक शाळेच्या आवारात शालेय समिती अध्यक्ष कृष्णकांत सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी माजी अध्यक्ष प्रभाकर सुर्वे व कृष्णकांत सुर्वे यांच्या हस्ते दोनशे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. संस्था सभासद राजेंद्र सुर्वे यांनी हे साहित्य दिले. ग्रामपंचायत आवारात सरपंच गीता सुर्वे तर जिल्हा परिषद मराठी शाळेत माजी सैनिक (कै.) विलास सुर्वे यांच्या पत्नी वैभवी सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ग्रामपंचायतीतर्फे जिलेबीचे वाटप करण्यात आले.
------------
-rat१८p५.jpg
L43936
- रत्नागिरी ः रत्नागिरी पालिका आणि मैत्री स्वयं सहाय्यता बचतगट यांच्या संयुक्त स्वयंवर मंगल कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात आले. तत्पूर्वी जमलेले विद्यार्थी, उपस्थित स्मितल पावसकर, बिपिन बंदरकर आदी.
------------
मैत्री स्वयं सहाय्यता गटातर्फे वृक्षारोपण
रत्नागिरी ः रत्नागिरी पालिका आणि मैत्री स्वयं सहाय्यता बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वयंवर मंगल कार्यालयासमोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. या वेळी विविध औषधी झाडे, फुलझाडे, फळझाडे यांचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक झाडाला परिसरातील लहान मुलांची नावे देण्यात येऊन त्या प्रत्येक झाडाची जवाबदारी नाव असलेल्या लहान मुलांनी घेतली आहे. या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्षा आणि नगरसेविका स्मितल पावसकर यांनी आगळीवेगळी संकल्पना पुढे आणली. झाडांचे जतन व्हावे यासाठी त्यांनी नवी संकल्पना देत प्रत्येक झाडाला नावे दिली आणि त्या झाडांची जबाबदारी त्या मुलांवर दिली. त्यामुळे या झाडांचे चांगले संगोपण होणार आहे. या कार्यक्रमाला पालिचे उपमुख्याधिकारी प्रवीण माने, बिपिन बंदरकर, स्मितल पावसकर, निमेश नायर, ऋतुजा देसाई, मैत्री बचतगटाच्या अक्षता मयेकर, शलाका गार्डी, कळंबटे, समीर रहाटे, विजय चव्हाण, पल्लवी तावडे, परिसरातील लहान मुले व त्यांचे पालक तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------
-rat१८p६.jpg
43928
ः लांजा ः रुग्णवाहिकेची चावी लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे यांच्याकडे सुपूर्द करताना आमदार राजन साळवी, तहसीलदार प्रमोद कदम, उद्योजक सुनील कदम.
-------------
लांजा मराठा संघाला रुग्णवाहिका प्रदान
लांजा ः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लांजा तालुक्यातील पुनसकोंड गावचे सुपुत्र आणि मुंबईस्थित उद्योजक सुनील कदम यांच्याकडून लांजा तालुका मराठा संघाला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. ध्वजारोहणानंतर लांजा तहसील कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कदम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार राजन साळवी, तहसीलदार प्रमोद कदम, तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, नगराध्यक्ष मनोहर बाईत, कार्याध्यक्ष सुनील कुरूप, उपाध्यक्ष शरद चव्हाण आदी उपस्थित होते.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88170 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..