चिपळूण ः ''स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थीमवर पथनाट्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः ''स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थीमवर पथनाट्य
चिपळूण ः ''स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थीमवर पथनाट्य

चिपळूण ः ''स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थीमवर पथनाट्य

sakal_logo
By

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थीमवर पथनाट्य
चिपळूण, ता. १९ ः येथील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ''स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'' या थीमवर आधारित पथनाट्याचे सादरीकरण उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी करण्यात आले.
या पथनाट्यांमधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी शिक्षणक्षेत्रातील स्त्री-पुरुषांचे योगदान, भारताने अंधश्रद्धेवर मात करत वैज्ञानिक व अंतराळ क्षेत्रामध्ये केलेली प्रगती व स्वच्छतेची गरज यावर भाष्य केले. स्वातंत्र्यदिनी महसूल विभागातर्फे निघालेल्या रॅलीची सुरवात डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने सादर केलेल्या या पथनाट्याने झाली. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी पथनाट्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले.
या वेळी चिपळूणचे विविध अधिकारी, बहुसंख्य नागरिक,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी अरुण जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रदीप वळवी, विनायक बांद्रे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या पथनाट्याचे कौतुक केले. या पथनाट्यामध्ये योगिनी सहस्रबुद्धे, सई जोशी, अनुष्का रोकडे, मदिहा चौगले, अक्सा बाचणे, फातिमा खान, अरबीना खान, चैतन्य कुलकर्णी, आर्या सावंत, सानिया जुवळे, निधी देवधर, साहिल मोहिते, रिया शिंदे, समीक्षा देवरूखकर, श्रेया पवार, सुमित कदम, वरद साडविलकर आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88173 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..