रत्नागिरी-अमित विलणकरांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-अमित विलणकरांचा सत्कार
रत्नागिरी-अमित विलणकरांचा सत्कार

रत्नागिरी-अमित विलणकरांचा सत्कार

sakal_logo
By

-rat१८p२४.jpg
L43968
-रत्नागिरी ः श्री दत्त सेवा मंडळ देवस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमित विलणकर यांचा सत्कार करताना जिल्हा कुस्ती असोसिएशनचे पदाधिकारी.
--------------
जिल्हा कुस्ती असोसिएशनतर्फे
अमित विलणकरांचा सत्कार
रत्नागिरी, ता. १९ ः श्री दत्तसेवा मंडळ या चार वाड्यांच्या देवस्थानच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा एकमुखी दत्त मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्‍यांना गौरविण्यात आले.
रत्नागिरीतील प्रसिद्ध एकमुखी दत्तमंदिराचे नोंदणीकृत मंडळ असलेले श्री दत्तसेवा मंडळ घुडेवठार, पाटीलवाडी, विलणकरवाडी आणि चंवडेवठार या चार वाड्यांमध्ये कार्यरत आहे. रविवारी देवस्थानच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये अध्यक्षपदी अमित विलणकर यांची बिनविरोध निवड झाली. त्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा भाई उर्फ श्रीकृष्ण विलणकर, डॉ. चंद्रशेखर केळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शिवाय रत्नाकर सुर्वे, अजय विलणकर, विशाल मुंडे, राजेश बोरकर, पराग विलणकर, मुकुंद विलणकर, राजेंद्र घुडे, प्रकाश घुडे, मनोज घुडे, सुरेंद्र घुडे, सुमित नागवेकर, अर्चना मयेकर, प्रेरणा विलणकर, संकेत चवंडे, शशांक चवंडे, किरण खडपे यांचाही कुस्ती असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून सत्कार करण्यात आला. या वेळी कुस्ती असोसिएशनचे सदानंद जोशी, आनंद तापेकर, फैयाज खतिब व संदेश चव्हाण उपस्थित होते.