रत्नागिरी-ठिबक व तुषार संचासाठी शेतकर्‍यांना अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-ठिबक व तुषार संचासाठी शेतकर्‍यांना अनुदान
रत्नागिरी-ठिबक व तुषार संचासाठी शेतकर्‍यांना अनुदान

रत्नागिरी-ठिबक व तुषार संचासाठी शेतकर्‍यांना अनुदान

sakal_logo
By

पैसे चित्र वापरा
...
ठिबक व तुषार संचासाठी
अनुदान; लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी, ता. १९ : प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार संच बसविण्यासाठी देखील बहुधारक शेतकऱ्‍यांना ४५ टक्के, अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्‍यांना ५५ टक्के अनुदान प्रवर्गनिहाय देण्यात येते. त्याला पुरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत शेती सिंचन योजनेमधून अनुक्रमे ७५ टक्के व ८० टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ इच्छुक शेतकऱ्‍यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातर्फे केले आहे.
शेतकऱ्‍याने या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक असून शेतकरी स्वतः किंवा आपले सरकार केंद्रामार्फत अर्ज करू शकतात. प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजना ठिबक व तुषार संच या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्‍यांच्या अर्जाचे प्रमाण कमी असून अर्ज संख्या वाढविण्याकरीता मोहीम स्वरूपात प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याचे अर्ज घेण्याकरीता १५ ते २९ ऑगस्ट या पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पंधरावड्यात कृषी सहाय्यकामार्फत प्रत्येक गावातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्‍यांना योजनेची माहिती देऊन महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यात येणार आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या अधिक माहितीसाठी ग्रामपातळीवर कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ स्तरावर, मंडळ कृषि अधिकारी आणि जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांचेशी संपर्क साधावा.