कणकवली : प.स. तृतीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : प.स. तृतीय
कणकवली : प.स. तृतीय

कणकवली : प.स. तृतीय

sakal_logo
By

44154
कणकवली ः येथील पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. शेजारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी.
---

कणकवली पंचायत समिती
आवास योजनेमध्ये तृतीय

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव

कणकवली,ता. १९ ः ग्रामीण भागातील नागिरकांना प्राधाण्य देत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्हास्तरावर कणकवली पंचायत समितीने तिसरा क्रमांक पटकावला. याबाबत सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद पालकर, वरिष्ठ सहाय्यक मंदार तांबे, मनोज चव्हाण, सायली कदम यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
राजाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात कणकवली पंचायत समितीने गोरगरीब जनतेसाठी कौतुकास्पद काम केले आहे. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीने केलेल्या कामाचे कौतुक म्हणून सत्कार करण्यात आला. गेल्या काही वर्षात कणकवली पंचायत समितीने ग्रामीण स्तरावर केलेल्या कामाची ही पोचपावती मानली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील ६३ गावातील सरपंच ग्रामसेवक यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कणकवली पंचायत समितीने विविध योजना ग्रामीण भागात पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. गरीबांना आवास देण्यासाठी ग्रामसेवकांना सूचना केल्या होत्या. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत आवास योजना साकरली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88375 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..