कुडाळ तालुक्यात ‘स्त्री शक्ती’चा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ तालुक्यात ‘स्त्री शक्ती’चा जागर
कुडाळ तालुक्यात ‘स्त्री शक्ती’चा जागर

कुडाळ तालुक्यात ‘स्त्री शक्ती’चा जागर

sakal_logo
By

44178
कुडाळ ः विधवा प्रथा बंदला शपथ घेत हात उंचावून हजारो महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

44179
कुडाळ ः दशावतार नाट्यकृतीतून विधवा प्रथा बंदचा संदेश देण्यात आला. (छायाचित्रे ः अजय सावंत)

कुडाळ तालुक्यात ‘स्त्री शक्ती’चा जागर

पंचायत समितीचा उपक्रम; शेकडो महिलांना मिळाली ऊर्जा

अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः विधवा प्रथा बंद, चाल तू पुढे! मिशन वात्सल्य...श्रावणमेळा, या उपक्रमातून येथील पंचायत समितीने नुकताच तालुकाभर स्त्री शक्तीचा प्रभावी जागर केला. पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेला हा उपक्रम तालुक्यातील शेकडो महिलांना ऊर्जा देणारा ठरला. विधवा प्रथा बंद करण्याचा उपक्रम प्रभावी करण्याचे श्रेय या निमित्ताने तालुक्याने मिळवले.
येथील पंचायत समितीच्या माध्यमातून विधवा प्रथा बंद, महिला पुनर्विवाह, विधवा महिलांच्या यशोगाथा तसेच विधवा महिला व कोरोनामध्ये ज्या महिलांच्या पतींचे निधन झाले, अशांसाठी मिशन वात्सल अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचे लक्षवेधी स्टॉल हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. राज्यात सर्वप्रथम प्रशासक तथा गटविकास अधिकारी चव्हाण यांची पांग्रड चर्मकारवाडी विधवा प्रथा बंद करणारी पहिली वाडी ठरली. या कार्यक्रमाचा शुभारंभ विठ्ठल नामाचा गजर करीत नृत्याविष्कारातून शितल पाटील व ग्रुप अंगणवाडी सेविका पणदूर १ यांनी केला. यानंतर दशावतारी पारंपारिक नाट्यकृतीतून महिला या श्रेष्ठ आहेत व महिलांवरचे अन्याय रोखण्यासाठी स्त्री हीच माता, भगिनी, अर्धांगिनी आहे, असा संदेश माणगाव एनआरएलएम यांनी दिला. विधवा प्रथा बंदी, विधवा पुनर्विवाह यासारखे धाडसी विचार मांडणारे पथनाट्य वालावल पीएचसी आशा तसेच वालावल बीट अंगणवाडी सेविका तसेच माणगाव पीएचसीच्या आशा यांनी सादर केले. नृत्यांच्या दमदार सादरीकरणातून विधवा महिलांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न मानसी पाटकर व तिच्या सहकारी बीट पणदूर २ अंगणवाडी सेविका तसेच पल्लवी वाककर व सहकारी अंगणवाडी सेविका बिट पणदूर २ यांनी केला. राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज या प्रसंगावर आधारित यांची थांबा आऊसाहेब ही ऐतिहासिक नाटिका शितल पाटील व तिच्या सहकारी यांनी सादर केली. कोकणातील पारंपारिक संस्कृती असलेली व श्रावणातील सणांमध्ये हमखास खेळली जाणारी फुगडी या नृत्य प्रकारामधून वालावल बीटच्या अंगणवाडी सेविका यांनी फुगडीच्या गीतामधून विविध संदेश दिले. मानसी वर्दम व सहकारी अंगणवाडी सेविका पणदूर २ यांनी शुभकार्यारंभी नृत्य सादरीकरणातून विधवा महिलांना देखील शुभकार्यात सामावून घेण्याबाबतचा सामाजिक संदेश दिला. समाजातील विधवा महिलांच्या प्रगतीसाठी उत्कर्षासाठी समाजातील महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असा संदेश देत प्राथमिक शिक्षक संघाने दशावतारी नाटकातून महिलांपर्यंत पोहोचता केला. शीतल पाटील आणि तिच्या सहकारी अंगणवाडी सेविकांचे नृत्य कौतुकास्पद ठरले. कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने विधवा प्रथा बंदबाबत सर्वांना शपथ दिली. यावेळी हजारो महिलानी हात उंचावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, तहसीलदार अमोल पाठक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वीय सहायक व राज्यातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका रिया आळवेकर, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते के. टी. चव्हाण, माजी नगरसेविका उषा आठल्ये, सायली कांबळी आदी उपस्थित होत्या.
--------
चौकट
आवाहनाला प्रतिसाद
श्री. चव्हाण यांनी सर्व महिला वर्ग माझा सर्व स्टाफ यांच्या सहकार्याने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव घेण्यासाठी आवश्यक ती प्रचार-प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करून समाजासमोर जाऊन सकारात्मक निर्णय घेतले व ठराव एकमुखाने अगर बहुमताने पारित केले.
--------------
कोट
महिलांना आजही समाजात काही अंशी त्रास दिला जातो. महिला एकत्र एक विचाराने राहिल्यास समाजात कोणतेही परिवर्तन घडवू शकतो. विधवा प्रथा बंदबाबत कुडाळ पंचायत समितीने पुढचे पाऊल टाकले आहे. हा उपक्रम राज्य व देशासाठी आदर्शवत असाच आहे.
- के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88403 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..