फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

44176
गोठोस ः ग्रुप ग्रामपंचायतच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना विशाल परब.

गोठोस ग्रामपंचायत
नूतन वास्तूचे उद्‍घाटन
कुडाळ, ता. २० ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत गोठोस नूतन वास्तूचे युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोठोस ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा स्वागत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये, कुडाळ पंचायत समिती माजी सभापती मोहन सावंत, नारूर सोसायटी अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ पंचायत समिती माजी सदस्या प्रमिला सावंत, नारूर सोसायटी उपाध्यक्ष शंकर निकम, वाडोस सरपंच संजना म्हाडगूत, सरपंच सूरज कदम, सदस्य राजा धुरी, सदस्या वैशाली धुरी, सदस्या अस्मिता लाड, सदस्या वैशाली भितये आणि ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी परब यांनी ग्रुप ग्रामपंचायत गोठोस नूतन वास्तू प्रवेशित झाल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले. मी गोठोस गावच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले.