विद्यार्थ्यांनो, मूल्यनिश्चिती गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनो, मूल्यनिश्चिती गरजेची
विद्यार्थ्यांनो, मूल्यनिश्चिती गरजेची

विद्यार्थ्यांनो, मूल्यनिश्चिती गरजेची

sakal_logo
By

44183
मालवण ः भावनिक सजगता-एक संवाद कार्यक्रमात बोलताना डॉ. पूजा मालपेकर.

विद्यार्थ्यांनो, मूल्यनिश्चिती गरजेची

डॉ. पूजा मालपेकर ः ‘भावनिक सजगतेवर’ मालवणात धडे

मालवण, ता. १९ ः किशोरवयीन मुलांमध्ये ज्याप्रमाणे शारीरिक बदल होतात, त्याप्रमाणे मनाच्या पातळीवरही अनेक बदल होत असतात; मात्र ते बदल तेवढे लक्षात घेतले जात नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्यांने मूल्यनिश्चिती करणे गरजेचे आहे. मी कोण आहे, याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन मानसोपचार समुपदेशक डॉ. पूजा मालपेकर यांनी येथे व्यक्त केले.
येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्र व टोपीवाला हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने ‘भावनिक सजगता- एक संवाद’ कार्यक्रमाचे टोपीवाला हायस्कूल येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मानसोपचार समुपदेशक डॉ. मालपेकर यांनी उपस्थित नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘भावनिक सजगता’ विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना पंचेंद्रिये यामध्ये डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा याविषयी मार्गदर्शन केले. मुलांमध्ये भावनेच्या भरात अनेक वाईट गोष्टी घडताना दिसतात. त्यावेळी आपल्या भावनांवर नियंत्रण कशाप्रकारे ठेवावे, याविषयी त्यांनी माहिती दिली. त्यांच्याशी निगडित श्वासाच्या व्यायामाविषयी मुलांकडून काही प्रात्यक्षिके करून घेत श्वासाप्रती असलेली सजगता याबद्दल मुलांशी संवाद साधला. तसेच मुलांना राग, आनंद, दुःख, तिरस्कार या मनातल्या भावनांविषयी माहिती करून दिली.
दोन सत्रांमध्ये हा कार्यक्रम झाला. सल्ला केंद्राचे समुपदेशक मनोज गिरकर यांनी सूत्रसंचालन केले. टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर, पर्यवेक्षक श्री. प्रभुखानोलकर, ज्योती तोरसकर, श्रीमती साटलकर आदींचे सहकार्य लाभले. समुपदेशक अदिती कुडाळकर, विजय कुडाळकर उपस्थित होते. ज्योती तोरसकर यांनी आभार मानले.