रत्नागिरी- छोट्या छोट्या गोष्टीतून जागवा देशभक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- छोट्या छोट्या गोष्टीतून जागवा देशभक्ती
रत्नागिरी- छोट्या छोट्या गोष्टीतून जागवा देशभक्ती

रत्नागिरी- छोट्या छोट्या गोष्टीतून जागवा देशभक्ती

sakal_logo
By

rat१९p२.jpg-
४४१६३
रत्नागिरी ः शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेत बोलताना मंदार सावंतदेसाई. सोबत स्नेहा कोतवडेकर, राजेंद्र घाग, धरमसी चौहान, सचिन सारोळकर, सीए आनंद पंडित, प्रकाश सोहोनी, डॉ. राजीव सप्रे. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------
छोट्या छोट्या गोष्टीतून जागवा देशभक्ती
मंदार सावंतदेसाई; महर्षी कर्वे संस्थेत ध्वजारोहण
रत्नागिरी, ता. १९ः भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आज प्रत्येक गोष्टीशी संबंध येतो. त्यामुळे आपण काय करणार, हे ध्यानी घेतले पाहिजे. घरोघरी तिरंगा लावण्याच्या अभियानातून देशभक्ती जागृत झाली आहे. आपणही अनेक छोट्या गोष्टीतून देशभक्ती जागवू शकतो. वर्गात शिक्षक आले नाहीत तर शिस्त पाळली पाहिजे. पेपर लिहिताना कॉपी करू नये. वाहतूक पोलिस नसताना सिग्नल तोडून गाडी हाकू नका. हेल्मेट स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. ते वापरले पाहिजे. आपण तारतम्य बाळगले तर देशभक्तीचा आविष्कार दिसेल, असे प्रतिपादन महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेचे शिरगाव प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी केले.
कर्वे शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर कार्यक्रमात ते म्हणाले की, १८५८ मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी मुलाला पाठिशी बांधून इंग्रजांशी दोन हात केले. सुराज आपल्याला हवे आहे, असे जाहीर केले तर १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य मिळवणारच ही गर्जना केली. सुराज ते स्वराज्य असा हा प्रवास आहे. भविष्याकडे जाताना या गोष्टींचे स्मरण केलेच पाहिजे. भारतीय इतिहासात या दोन्ही गोष्टी मैलाचा दगड ठरल्या. अनेकांनी बलिदान दिले आहे. स्वराज्य मिळताना काय काय घटना घडल्या त्याचे स्मरण केले पाहिजे. सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. प्रतिभा लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष राजेंद्र घाग, सीए आनंद पंडित, प्रकाश सोहनी, शिल्पा पानवलकर, आदिती देसाई, डॉ. राजीव सप्रे, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, बीसीए कॉलेजच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, रोटरीचे ज्येष्ठ सदस्य धरमसी चौहान, नीलेश मुळ्ये, सचिन सारोळकर, नीलेश पावसकर, राजीव देवळे, रूपेश पेडणेकर, सीए आनंद पंडित, शिल्पा पानवलकर, आदिती देसाई आदी उपस्थित होते.

चौकट
कॉलेज तिरंगामय
बीसीएच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांतील विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी, पोस्टर्स साकारली. या प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष राजेंद्र घाग यांनी केले. तसेच संपूर्ण महाविद्यालयात तिरंग्याच्या रंगांतील फुगे, कागदापासून फुले, हस्तकलेच्या वस्तू, ओरिगामी कलेतून सजावट केली होती. या सर्व उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88424 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..