मंडणगड - पालघरमध्ये ग्रामस्थांना मालमत्ता अधिकार पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - पालघरमध्ये ग्रामस्थांना मालमत्ता अधिकार पत्र
मंडणगड - पालघरमध्ये ग्रामस्थांना मालमत्ता अधिकार पत्र

मंडणगड - पालघरमध्ये ग्रामस्थांना मालमत्ता अधिकार पत्र

sakal_logo
By

rat१९p६.jpg -
44196
पालघरः मालमत्ता अधिकार अभिलेख प्रदान करताना तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, सोबत भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक सुप्रिया शिंत्रे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर व मान्यवर.
------------
पालघरमध्ये ग्रामस्थांना मालमत्ता अधिकार पत्र
सनद वाटप ; ड्रोनद्वारे झाले होते सर्वप्रथम गावठाण सर्वेक्षण
मंडणगड, ता. १९ ः राज्य शासनाने ड्रोनद्वारे गावठाण जमिनीचे सर्वेक्षण या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरवात जिल्ह्यात सर्वात प्रथम मंडणगड तालुक्यातील पालघर गावामध्ये २२ नोव्हेंबर २०२१ ला केली होती. जिल्ह्यात सर्वात आधी गावठाणाचे ड्रोन सर्वेक्षणाचा मान मिळालेल्या पालघर गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती दिनी सर्वेक्षणात तयार झालेल्या मालमत्तेचे अधिकार अभिलेखाचे (मालमत्ता पत्रक) वाटप पालघर येथे हसीलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात भूमि अभिलेख विभागाचे कर्मचारी धनाजी माने, पांडुरंग राठोड, दिलीप बेजगमवार, धाडवे, मंदार सालेकर, प्रथमेश साळवी, वर्षा खांडेकर, पालवे, अशोक बैकर, अनंत घाणेकर, सत्तार चिखलकर, अंजुम चिखलकर, अबुबकर बुरोंडकर, संदेश खांडेकर, अनंत गुडेकर, समीर म्हामुणकर, महेश लोखंडे आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात २०२१ पासून स्वामित्व योजनेची अमंलबजावणी सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अधिकार अभिलेख (सातबारा) नसलेल्या गावठाणातील जमिनींची मोजणी अत्याधुनिक ड्रोनद्वारे करण्यात आली. महाराष्ट्रातील ग्रामविकास विभागाच्या वतीने अत्याधुनिक ड्रोनद्वारे अचूक व जलद गतीने जमीन मोजणीचा उपक्रम राबवण्यात आला. त्याद्वारे गावठाणातील जमीनधारकांना आपल्या मिळकतीच्या सीमांचे नेमके क्षेत्र माहित झाल्याने गावठाणातील धारकांना आपल्या मालमत्तेचे अधिकार अभिलेख (मालमत्ता पत्रक) मिळाले आहेत. मालमत्ता पत्रक म्हणजेच गावठाणातील धारकांना घर व जागेचा मालकी हक्काचा पुरावा असेल. या वेळी तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी सर्वात प्रथम राबवलेल्या गावातील गावठाण मालमत्ता अधिकार अभिलेख ग्रामस्थांना देण्याचा मान मला मिळाला. या क्षणी ग्रामस्थांमधील समाधान पाहताना माझा आनंद द्विगुणित झाला आहे. आता खऱ्या अर्थाने गावठाण जमीनधारक जमीनमालक झाला आहे, याचे समाधान आहे. भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक शिंत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
----------
कोट
स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर देखील अद्याप गावठाणातील स्वतःची मालकी नसलेल्या जमीनधारकाला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती दिनानिमित्त मालमत्तेचे अधिकार अभिलेख मिळणे हा योगायोग असला तरी शासनाचा हा उपक्रम स्वागतार्ह आहे.
- नितीन म्हामुणकर, माजी पंचायत समिती सदस्य.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88453 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..