डॉ. धर्माधिकारी कणकवलीत रुजू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. धर्माधिकारी कणकवलीत रुजू
डॉ. धर्माधिकारी कणकवलीत रुजू

डॉ. धर्माधिकारी कणकवलीत रुजू

sakal_logo
By

डॉ. धर्माधिकारी
कणकवलीत रुजू
कणकवली ः येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची नियुक्ती झाली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. डॉ. धर्माधिकारी यांनी यापूर्वी कनेडी (ता.कणकवली) प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांची तुळजापूरला बदली झाली होती. एम.डी.चे शिक्षण पूर्ण करून कराड उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होते.
--
कनेडी - नरडवे
रस्त्यावर खड्डे
कणकवली ः शहरातून कनेडी नरडवे या पंचक्रोशीत जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मुसळार पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. दोन वर्षांपुर्वी या रस्‍त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र, पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
-------------
कामगार केंद्रात
विद्यार्थ्यांना धडे
कणकवली ः ठाणे विभाग गट कार्यालय चिपळूणतर्फे कणकवली कामगार कल्याण केंद्र येथे एनसीसी विद्यार्थ्यांसाठी ‘देशप्रेमाची जागृती’ विषयावर कारगिल युद्धात सहभाग असलेले माजी सैनिक दत्तगुरू गावकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त विजय पारकर, मुख्याध्यापक विद्यामंदिर हायस्कूलच्या एनसीसी विभागाचे शिक्षक अमोल शेळके उपस्थित होते.
--
पेंशनर्सची आज
मासिक सभा
कणकवली ः तालुका पेंशनर्स असोसिएशनची मासिक सभा उद्या (ता २०) सकाळी साडेदहाला आयोजित केली आहे. संस्थेच्या पेन्शनर भवन, कलमठ येथील कार्यालयात ही सभा होणार आहे. यावेळी पेन्शनबाबत व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष सीताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.
--
रसिका पालवचे
उल्लेखनीय यश
वेंगुर्ले ः बॅचलर ऑफ इंजिनियरिंग इन कॉम्पुटर या पदवी परीक्षेत वेंगुर्ले वडखोल सुकन्या रसिका पालवने पुणे येथील जे. एस. पी. एम. जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयातून ८८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
ृृ----
भरड येथे
आज रक्तदान
चौके ः चौके वावळ्याचे भरड येथील भराडी कला-क्रीडा-विकास मंडळातर्फे उद्या (ता.२०) सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरुणांनी रक्तदान करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88463 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..