ओटवणेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओटवणेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
ओटवणेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

ओटवणेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

ओटवणेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
ओटवणे ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभागाच्यावतीने कलंबिस्त येथे आयोजित तालुकास्तरीय शेतकरी मेळाव्यात उपविभागीय कृषी अधिकारी आडसुळे, सावंतवाडी मंडल कृषी अधिकारी देसाई, जिल्हा समन्वयक प्रताप चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कलंबिस्त सरपंच शरद नाईक यांनी कृषी योजना व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतीमध्ये प्रगती करण्याचे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले. कलंबिस्त उपसरपंच नामदेव पास्ते, कृषी सहाय्यक सी. सी. रेडकर, स्वप्नील शिर्के, एन. के. साखरे, ए. आर. खराडे, एस. ए. घेरडे, एस. एस. निकम तसेच तंटामुक्ती समिती अध्यक्ष सगुण पास्ते, सह्याद्री शेतकरी गटाच्या अध्यक्षा कविता देसाई, अन्नपूर्णा शेतकरी गटाच्या अध्यक्षा रश्मी गवस, सामाजिक कार्यकर्ते अशोक राऊळ, शाहू पास्ते, चंद्रकांत सावंत, कृष्णा देसाई, राघो सावंत, सुरेश तावडे, उदय सावंत उपस्थित होते.
-----------------------
सांगेलीत ३८ जणांचे रक्तदान
ओटवणे ः सांगेली माजी विद्यार्थी संघटना, सांगेली युवा विकास प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांगेली केंद्रशाळा येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त झालेल्या या रक्तदान शिबिरात ३८ जणांनी रक्तदान केले. सरपंच सौ. सुवर्णा राऊळ, उपसरपंच रमाकांत राऊळ, माजी सैनिक बाबुराव कविटकर, माजी सरपंच रवीश केरकर, प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंचवाडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर सांगेलकर, सांगेली सोसायटी संचालक गुरुप्रसाद राऊळ, जयानंद सावंत, मुख्याध्यापक अनिता शिर्के, कृषी सहाय्यक अनमोल गावडे, पंढरी सावंत, गिरीधर राऊळ, पुंडलिक राऊळ, आशिष अमरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88475 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..