गणेशोत्सवात विजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवात विजपुरवठा
सुरळीत ठेवण्याची मागणी
गणेशोत्सवात विजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

गणेशोत्सवात विजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

sakal_logo
By

44241
बांदा ः येथे महावितरणचे सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना निवेदन देताना बाबा काणेकर.

गणेशोत्सवात वीजपुरवठा
सुरळीत ठेवण्याची मागणी
बांदा, ता. १९ ः गणेश उत्सव काळात शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी केली आहे. दरम्यान, प्रलंबित कामे चतुर्थी पूर्वी पूर्ण करून घ्यावीत, तसेच स्थानिकांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवाव्यात, कामात अडचणी येत असतील तर आम्ही सर्वतोपरी मदत करू, असेही त्यांनी सांगितले. याबाबत आज विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष साई सावंत, सुनील धामापूरकर, साईश सावंत, केदार कणबर्गी आणि हेमंत दाभोलकर उपस्थित होते. अभियंता कोहळे यांनी गणेश चतुर्थी कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88481 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..