शिवांगी नृत्य मल्हार प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवांगी नृत्य मल्हार प्रथम
शिवांगी नृत्य मल्हार प्रथम

शिवांगी नृत्य मल्हार प्रथम

sakal_logo
By

-rat१९p४.jpg ः
४४१९४
साडवली ः खुला गट प्रथम क्र. शिवांगी नृत्य मल्हार, देवरूख.
-------------
कृष्णगीत समूहनृत्य स्पर्धेत
शिवांगी नृत्य मल्हार प्रथम
साडवली ः देवरूख येथे गोकुळाष्टमीनिमित्त महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई तालुका शाखा संगमेश्वर (देवरूख)यांच्यामार्फत श्रीकृष्ण गीतांवर समूहनृत्य स्पर्धा माटे भोजने सभागृहात घेण्यात आल्या. या स्पर्धेत शाळा गटात केंद्रशाळा पाटगाव प्रथम, जि. प. पद्मा कन्याशाळा साखरपा-द्वितीय, जि. प. शाळा देवरूख नं. ३ तृतीय, कबनुरकर इंग्लिश मीडियम साखरपा चतुर्थ आणि देवरूख शाळा नं. ४ ने पाचवा क्रमांक पटकावला. खुल्या गटात अनुक्रमे शिवांगी नृत्य मल्हार, स्टाइल डान्स अॅकॅडमी, ललित कला अॅकॅडमी, गिरजाई ग्रुप आणि शिवांगी नृत्य मल्हारने पाचवा क्रमांक पटकावला. देवरूख नगरपंचायतीचे बांधकाम सभापती संतोष केदारी यांनी या स्पर्धा पुरस्कृत केल्या. कृष्णकांत कुंटरन, सागर शिरकर यांनी परीक्षण केले. श्रिया भालेकर, संजय बांडागळे यांनी सुत्रसंचालन केले. तालुकाभरातून स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना गौरवले. डान्स अॅकॅडमीच्या अशोक आखाडे, शिल्पा मुंगळे, नीलेश वाडकर, समीर महाडीक यांचा सन्मान करण्यात आला. रात्री १२ वा. श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.
-------
-ratchl१९६.jpg
2L44174
ः चिपळूण ः विजेत्यांचा सन्मान करताना तहसीलदार सूर्यवंशी.
-----------
गायन स्पर्धेत आर्या पोटे प्रथम
चिपळूण ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चिपळूण पालिकेने आयोजित केलेल्या स्फूर्तिगीत गायन स्पर्धेत आर्या पोटे हिने तर सामूहिक गीतगायन स्पर्धेत पेढे येथील आर. सी. काळे महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धा देशभक्तीची चेतना निर्माण करणाऱ्‍या ठरल्या. चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले. याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनानंतर सलग दोन दिवस देशभक्तीपर आधारित स्फूर्तिगीत व समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये एकूण १८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यातील स्फूर्तिगीत गायन स्पर्धेत आर्या पोटे प्रथम, स्नेहा आठवले द्वितीय, आयुष वाजे तृतीय तर स्वरा यादव हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. श्री आनंदराव पवार महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. तहसीलदार जयराज सूर्यवंशी व मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे प्रशस्तीपत्र देऊन प्रशिक्षणार्थींना गौरवले.
----------