रत्नागिरी ः मिलके स्विमिंग ग्रुपची आंतरराष्ट्रीय भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः मिलके स्विमिंग ग्रुपची आंतरराष्ट्रीय भरारी
रत्नागिरी ः मिलके स्विमिंग ग्रुपची आंतरराष्ट्रीय भरारी

रत्नागिरी ः मिलके स्विमिंग ग्रुपची आंतरराष्ट्रीय भरारी

sakal_logo
By

-rat१९p९.jpg
44199
ः रत्नागिरी ः येथील महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे यशस्वी खेळाडू सोबत महेश मिलके आणि डॉ. निशिगंधा पोंक्षे.
---------
मिलके, काळेंची सुवर्णभरारी; घडणार पोर्तुगालची वारी

पुण्यातील राष्ट्रीय क्रीडास्पर्धेमध्ये चमकले; मिलके स्विमिंग ग्रुपचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः पुणे बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपने आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी मारली. बॅटल, (रन स्विम रन), थ्रीटल, (रन स्विम शूट) व लेझर रन (रन अँड शूट) अशा स्पर्धा तेथे झाल्या. स्पर्धेमधून पोर्तुगाल येथे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली.
स्पर्धेमध्ये देशभरातून वेगवेगळ्या वयोगटातून सातशे ते आठशे स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या १९ स्पर्धकांनी मॉडर्न पॅथलोन असोसिएशन ऑफ रत्नागिरी यांच्यामार्फत सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. आयुष काळे याने १३ वर्षाखालील रिटर्नमध्ये सुवर्णपदक प्रथम क्रमांक, बॅटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक, रन शूट रन (ब्राँझ मेडल) तृतीय क्रमांक तर निधी भिडे हिने ११ वर्षाखालील थ्रीटल सिल्वर मेडल द्वितीय क्रमांक, बॅटल -सिल्वर मेडल द्वितीय क्रमांक, रन शूट रन मध्ये ब्राँझ मेडल तृतीय क्रमांक प्राप्त केला. कार्तिकी भुरवणे हिने बॅटलमध्ये ब्राँझ मेडल तृतीय क्रमांक, बॅटल (ब्राँझ मेडल) तृतीय क्रमांक. सोहम साळवी रन शूट रनमध्ये ब्राँझ मेडल तृतीय क्रमांक.
..
चौकट
तनया, निपुण, योगेंद्रचीही निवड
यशस्वी खेळाडूंची २२ ते २५ सप्टेंबर २०२२ व २४ ते ३० ऑक्टोबर २०२२ ला पोर्तुगाल येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्रकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्ट टाइमिंग दिलेल्या तनया मिलके, योगेंद्र तावडे, निपुण लांजेकर या तीन खेळाडूंची विशेष खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली.
-------
चौकट
रन शूट रनमध्ये गोल्ड मेडल
स्पर्धेमध्ये मिलके स्विमिंग ग्रुपचे करन मिलके याने १९ ते २१ वयोगटात रन शूट रनमध्ये गोल्ड मेडल प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला. बॅटलमध्ये (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक, थ्रीटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक. सागर तलवार याने २१ ते ३९ वयोगटात बॅटलमध्ये सिल्वर मेडल द्वितीय, रन शूट रन (कास्य मेडल) तृतीय क्रमांक प्राप्त केला. आर्यन घडशीने १९ वर्षाखालील वयोगटात थ्रीटलमध्ये (सिल्वर मेडल) द्वितीय, बॅटल (ब्राँझ मेडल) तृतीय क्रमांक पटकावला.