पालगड पाणीपुरवठा योजना मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालगड पाणीपुरवठा योजना मार्गी
पालगड पाणीपुरवठा योजना मार्गी

पालगड पाणीपुरवठा योजना मार्गी

sakal_logo
By

पालगड पाणीपुरवठा योजना मार्गी
दाभोळः दापोली तालुक्यातील पालगड येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार कदम म्हणाले, राष्ट्रीय पेयजल योजना बंद होऊन जलजीवन मिशन ही योजना आली. त्याच्या आराखड्यात ही योजना रामदास कदम यांनी मंजूर करून घेतली. त्यामध्ये पालगड गावाचा समावेश करण्यात आला. प्रादेशिक नळपाणी योजनेचे दोन भाग करून घेतले. पालगड गावासाठी वेगळी योजना व माटवण नवानगर त्या तीन-चार गावासाठी वेगळी योजना, असे दोन भाग करण्यात आले. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पहिली मागणी पालगडच्या नळपाणी योजनेची केली होती. ५ कोटी ३२ लाख रुपयाचा निधी या योजनेसाठी मंजूर झाला असून, प्रति मानसी ५५ लिटर पाणी मिळेल, असा आराखडा तयार करण्यात आला आहे. पालगड येथे सानेगुरूजी यांचे भव्य स्मारक उभारणार असून पालगड किल्ल्याचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे.
---------------
असोंडला शेतकरी मेळावा
दाभोळ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थी जागृती डोके, कांचन पवार, सोनाली घुले, सुप्रिया निंबाळकर, साक्षी शिर्के, विशाखा पिसाळ, रिद्धी धोपट यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत असोंड ग्रुपग्रामपंचायतीत कृषिप्रदर्शन व शेतकरी मेळावा घेतला. विविध कंदपिके, जैविक खते, विद्यापीठाने विकसित केलेल्या आंब्याच्या जाती, सुधारित कलमांच्या विविध पद्धती, विविध पिकांची लागवड कशी करावी याबद्दल माहिती असणारे तक्ते इत्यादीचे प्रदर्शन भरवले होते. कृषी सहाय्यक उदय बंगाल यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व, रानभाज्या व कंदपिकांची लागवडीबद्दल माहिती दिली.
-------------
दापोली अर्बन कॉलेजमध्ये ग्रंथप्रदर्शन
दाभोळ ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एस. आर. रंगनाथन् जयंतीनिमित्त दी ग्रेट इंडियन्स विषयावर आधारित विविध ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रा. डॉ. गंगा गोरे, प्रा. कैलास गांधी, प्रा. डॉ. बापू यमगर तसेच इतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्रांतिवीर तसेच भारतीय समाजसुधारक, समाजसेवक आणि भारतीय उद्योजक यांच्याबाबत माहिती देणारी सुमारे २०० पुस्तके ठेवली होती.
--------------
वेळवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी
बांधली वटवृक्षाला राखी
दाभोळ ः महाराष्ट्र शासन, सामाजिक वनीकरण रत्नागिरीअंतर्गत आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोली संचालित (कै.) गोविंदराव गुलाबराव दळवी हायस्कूल वेळवी येथे राष्ट्रीय हरितसेनेने केले अनोखे वृक्षसंवर्धन करताना वटवृक्षाला राखी बांधून वृक्षसंवर्धन करण्यासाठी वचनबद्ध झाले व वेगळा आदर्श निर्माण केला. या वेळी रेश्मा झगडे, सरपंच कल्याणी इवलेकर, उपसरपंच आत्माराम खेडेकर, जयेश हुमणे, मुख्याध्यापक राजेंद्रकुमार कुंभार, रवींद्र दळवी, मनोहर दळवी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88522 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..