राजापूर-राजापूर शहर उपजीविका केंद्राला मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापूर शहर उपजीविका केंद्राला मंजुरी
राजापूर-राजापूर शहर उपजीविका केंद्राला मंजुरी

राजापूर-राजापूर शहर उपजीविका केंद्राला मंजुरी

sakal_logo
By

rat19p16.jpg
44222
राजापूरः शहरासाठी मंजूर झालेल्या शहर उपजीविका केंद्राबाबतच्या आदेशाची प्रत मानसी जाधव, स्नेहा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करताना डॉ. किरण कुलकर्णी.
----------
राजापूर शहर उपजीविका केंद्राला मंजुरी
राजापूर, ता. १९ ः विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत राजापूर शहरांतील शहर उपजीविका केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरी आदेशाचे वितरण आयुक्त तथा संचालक नगर पालिका प्रशासन संचालनालय डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते राजापूर शहर स्तर संघाच्या अध्यक्षा मानसी जाधव, सचिव स्नेहा चव्हाण यांना शहर उपजीविका केंद्र मंजूर झाल्याच्या आदेशाचे वितरण करण्यात आले.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वा कांबळे यांनी राजापुरात या योजनेंतर्गत हे शहर उपजीविका केंद्र मंजूर करून घेण्याकामी मोलाचे सहकार्य केले आहे. या शहर उपजीविका केंद्रामधून शहरातील बचतगटांमार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा तसेच बचतगटांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88524 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..