कोंडसरमध्ये कोविड योद्ध्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडसरमध्ये कोविड योद्ध्यांचा सन्मान
कोंडसरमध्ये कोविड योद्ध्यांचा सन्मान

कोंडसरमध्ये कोविड योद्ध्यांचा सन्मान

sakal_logo
By

कोंडसरमध्ये कोविड योद्ध्यांचा सन्मान
राजापूर ः तालुक्यातील ग्रामपंचायत कोंडसर बुद्रुक येथे दहावी व बारावीमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कोविड काळामध्ये मोलाची कामगिरी बजवणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा सेविका, पोलिस पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात सरपंच आरती मोगरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्राथमिक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
--------------------
आनंदीबाई अभ्यंकरची प्रभातफेरी
रत्नागिरी ः श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालविद्यामंदिरातील विद्यार्थ्यांची राष्ट्रपुरुषांची वेशभूषा करून त्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. ती फेरी पतितपावन मंदिरावरून स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याला अभिवादन करून फाटक हायस्कूलमार्गे परत शाळेत आली. या प्रभातफेरीसाठी बालकमंदिरचे व्यवस्थापक अनिल आग्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका काळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी व पालक यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सर्व मुलांचे खूप कौतुक करण्यात आले.
---------------
फोटो टुडेत आहे.
-rat१९p७.jpg
2L44197
- रत्नागिरी ः सीए दुर्गा साखळकर हिचा सत्कार करताना डॉ. किशोर सुखटणकर, वसंत वाकडे आणि आईवडील.
----------
सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे
सीए दुर्गा साखळकर हिचा सत्कार
रत्नागिरी ः सारस्वत स्नेहवर्धक मंडळ व सारस्वत चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल व्यंकटेश येथे सत्कार समारंभ झाला. त्या प्रसंगी सीए परीक्षेत यश मिळवल्याबद्दल दुर्गा साखळकर हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ती सीए परीक्षेत उत्तीर्ण झाली. या प्रसंगी सारस्वत स्नेहवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर, कार्यवाह वसंत वाकडे, मंडळाचे पदाधिकारी, सारस्वत चेंबरचे संस्थापक सदस्य सीए सिद्धार्थ सिनकर, मंदार कानविंदे, दुर्गा हिचे आई-वडील उपस्थित होते.
-----------------
-rat१९p८.jpg
44198
- रत्नागिरी ः सारस्वत चेंबर्स आणि सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. किशोर सुखटणकर.
-----------
सारस्वत चेंबर्सतर्फे परिसंवाद
रत्नागिरी ः सारस्वत स्नेहवर्धक मंडळ व सारस्वत चेंबर्सच्या विद्यमाने नवउद्योजकांना माहिती देणाऱ्या मार्केटिंग या विषयावर सेमिनार आयोजित केले. यात मार्केटिंग आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील तज्ज्ञ मंदार कानविंदे यांनी मार्केटिंग व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन केले. सेमिनार हॉटेल व्यंकटेश येथे झाले. मार्केटिंग व्यवस्थापन करताना ग्राहकांच्या भावनिक प्रतिक्रियांचा अभ्यास करून आस्थापनात केलेले बदल व्यवसायाला नेहमीच फायदेशीर असतात, हे उदाहरणासह स्पष्ट केले. त्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. प्रास्ताविक सारस्वत मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. त्यानंर सारस्वत चेंबरचे संस्थापक सदस्य सीए सिद्धार्थ सिनकर यांनी सारस्वत चेंबर्सचे कार्य आणि समाजासाठी आयोजित केले जाणारे कार्यक्रम या विषयी माहिती दिली.
--------------
भडे शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम
रत्नागिरी ः लांजा तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा, भडे नं. १ येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिमाखदार सोहळा झाला. लोकमान्य टिळक जयंतीपासून दोन आठवडे विविध कार्यक्रम आयोजित केले. यात प्रभातफेरी, विविध स्पर्धा, बालसभा, रॅली, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्याध्यापिका प्राजक्ता रहाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भडे गावात प्रभातफेरी, जनजागृती फेरी काढण्यात आली. देशाभिमान वाढवण्यासाठी क्रांतिकारक, महापुरुषांची बोलकी वेशभूषा करून घोषणा, देशभक्तीपर गीतगायन, लेझीम पथक, बॅंड पथक यांच्या तालावर करण्यात आले. बालसभेत भारतीय स्वातंत्र्यदिन, तिरंगा, देशसेवक, क्रांतिकारक विषयावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. त्याचप्रमाणे हर घर तिरंगा उपक्रमावर आधारित पथनाट्य, नाटिका, पोवाडा, समूहनृत्य सादरीकरण करण्यात आले. सरपंच तेंडुलकर, वृषाली लोखंडे, आग्रे, लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिक्षिका पूर्वा कुळकर्णी यांनी केले. सिद्धी मांडवकर यांनी आभार मानले.
----------------
मेकअप, मेहंदी प्रशिक्षणाचे आयोजन
रत्नागिरी ः महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ व सजिली स्पा अॅण्ड ब्युटी केअरमार्फत ब्युटीपार्लर, मेकअप् आणि मेहंदी कोर्स आयोजित करण्यात आले आहेत. कोर्स पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना शासनमान्य सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सजिली स्पा अॅण्ड ब्युटी वेअर, जेलरोड, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.