निगुडे-सोनुर्ली रस्ताप्रश्नी आंदोलन तूर्त स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगुडे-सोनुर्ली रस्ताप्रश्नी
आंदोलन तूर्त स्थगित
निगुडे-सोनुर्ली रस्ताप्रश्नी आंदोलन तूर्त स्थगित

निगुडे-सोनुर्ली रस्ताप्रश्नी आंदोलन तूर्त स्थगित

sakal_logo
By

निगुडे-सोनुर्ली रस्ताप्रश्नी
आंदोलन तूर्त स्थगित
बांदा, ता. १९ ः निगुडे, शिर्ले व सोनुर्ली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थ लक्ष्मण निगुडकर यांनी २९ ऑगस्टला पुकारलेले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळा संपताच तत्काळ काम हाती घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी दिलेल्यी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, रस्त्यावरील मोऱ्यांना पडलेले खड्डे बुजविणे. रस्त्याच्या साईड पट्टीवर बांध घालून पाण्याचा निचरा गटारात सोडणे. गटारांची साफसफाई करून पाण्याची विल्हेवाट लावणे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अनावश्यक झाडी तोडून रस्ता मोकळा करणे. रस्त्यावर दुरेकरवाडी, राणे वाडी, मधलीवाडी, तेलवाडी, जिल्हा परिषद शाळा नं. १, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी स्पिडबेकर बसविणे. रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, अशा विविध मागण्यांसाठी आपण २९ ऑगस्टला उपोषण जाहीर केले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाळा संपताच काम हाती घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मी तूर्तास स्थगित करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88528 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..