रत्नागिरी ः देशभक्तीचा विचार कायमस्वरूपी तेवत ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः देशभक्तीचा विचार कायमस्वरूपी तेवत ठेवा
रत्नागिरी ः देशभक्तीचा विचार कायमस्वरूपी तेवत ठेवा

रत्नागिरी ः देशभक्तीचा विचार कायमस्वरूपी तेवत ठेवा

sakal_logo
By

rat१९p२०.jpg ः
४४२३०
रत्नागिरी ः अशोक गॅस एजन्सीतर्फे माजी सैनिक, वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.
-------------
देशभक्तीचा विचार कायमस्वरूपी तेवत ठेवा
मधुसूदन सुर्वे ; अशोक गॅसतर्फे माजी सैनिकांचा सन्मान
रत्नागिरी, ता. १९ः आपल्या प्राणाची आहुती देऊन देशसेवेसाठी सीमेवर लढलेल्या शहीद जवानांच्या देशभक्तीचा त्यांच्या बलिदानाचा विचार प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी तेवत ठेवला पाहिजे. जिल्ह्यातील वीरसैनिक, शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा विशेष गौरव अशोका गॅस कंपनीने करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा प्रेरणादायी जनजागर केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती शौर्यचक्र प्राप्त माजी सैनिक, कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीतील अशोका गॅस कंपनीच्या सीएनजी युनिटतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शौर्यचक्र प्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी सुर्वे म्हणाले, आपण भारतीय सैनिकांसोबत नेहमी आहोत याची जाणीव या कृतीतून आपण करून देत राहू. त्यांचा मानसन्मान वेळोवेळी केला पाहिजे तरच सीमेवर जीवावर उदार होऊन देशसेवा करणार्‍या या सैनिकांना बळ प्राप्त होईल. या प्रसंगी जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा विशेष गौरव या वेळी करण्यात आला. यामध्ये खेड तालुक्यातील शिवखुर्द येथील वीरपत्नी सुनंदा बाळकृष्ण महाडिक, भेलसई येथील वीरपत्नी रवीता रघुनाथ कदम, निलवणे येथील छाया रवींद्र कदम, चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील माया मनोहर कदम यांचा कंपनीच्यावतीने शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन विशेष गौरव करण्यात आला. यानंतर शौर्यचक्र प्राप्त माजी सैनिक, कमांडो मधुसूदन सुर्वे यांचा महागौरव कंपनीच्यावतीने कंपनीचे व्यवस्थापक आशिष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. माजी सैनिक विजय आंबेरकर, कुंभारे यांचाही गौरव करण्यात आला.

चौकट
आठ युद्धांमध्ये सुर्वेंचा सहभाग
शौर्यचक्र प्राप्त माजी सैनिक, कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी देशाच्या सीमेवर देशसेवा बजावताना एकूण आठ युद्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात आसाममधील ऑपरेशन रियानो, जम्मू काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक, कारगिलचे ऑपरेशन विजय, जम्मू काश्मीर ऑपरेशन पराक्रम, मणिपूर ऑपरेशन हिफाजत १, नागालँड ऑपरेशन ऑर्चिड, मणिपूर ऑपरेशन हिफाजत २, डीआरसी दक्षिण आफ्रिका ऑपरेशन कांगो, मणिपूरमध्ये हिफाजत २ मध्ये त्यांना शत्रूशी लढताना पायामध्ये ११ गोळ्या लागल्या. यामध्ये त्यांना त्यांचा पाय कायमचा गमावावा लागला. माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना शौर्यचक्र प्राप्त झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88543 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..