सिंधुदुर्ग महिला कॅरम संघास कांस्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग महिला कॅरम संघास कांस्य
सिंधुदुर्ग महिला कॅरम संघास कांस्य

सिंधुदुर्ग महिला कॅरम संघास कांस्य

sakal_logo
By

44285
विरार ः ५६ व्या राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक विजेच्या जिल्ह्याचा महिला संघातील डावीकडून केशर निर्गुण, दिक्षा चव्हाण, मयुरी गावडे, प्रणिता आयरे, राजेश निर्गुण.


महिला कॅरम संघास ‘कांस्य’

विरारची स्पर्धा; सावंतवाडी, कणकवलीतील मुलींचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ ः महाराष्ट्र राज्य कॅरम ५६ वी अजिंक्यपद आणि आंतरजिल्हा स्पर्धा विरार येथे झाली. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग महिला कॅरम संघाने कांस्यपदक पटकाविले.
महिला सांघिक गटामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग असे ५ संघ सहभागी झाले होते. सिंधुदुर्गच्या पदक विजेत्या संघात केशर निर्गुण, सावंतवाडी (कर्णधार), दिक्षा चव्हाण, कणकवली, प्रणिता आयरे व मयुरी गावडे, सावंतवाडी या ४ ज्युनिअर गटातील मुली सहभागी झाल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंसह स्पर्धेत उतरलेल्या मुंबई आणि पुण्याच्या संघाविरुद्ध दुहेरीचा सामना सहज जिंकत मॅचमध्ये सनसनाटी निर्माण केल्यानंतर एकेरी सामन्यात तीन गेमपर्यंत कडवी झुंज दिल्यानंतर निसटत्या फरकाने सिंधुदुर्गने सामने गमावले. पालघर व ठाणे संघाविरुद्ध दुहेरी आणि एक एकेरी सामना जिंकत ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले. संघ व्यवस्थापक म्हणून सावंतवाडीचे राजेश निर्गुण यांनी काम पाहिले. सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या सध्याच्या कार्यकारिणीने अस्तित्वात आल्यापासून सर्वच स्तरावर उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे. या राज्य स्तरावरील सांघिक कांस्य पदकामुळे जिल्ह्यातील कॅरम प्रेमींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
---
जिल्ह्यासाठी अभिमानास्पद
ज्युनिअर गटाचे राष्ट्रीय खेळाडू घडवल्यानंतर केशर निर्गुण या ज्युनिअर गटातील खेळाडूने २०२१ मध्ये वरिष्ठ राज्यस्तरीय निवड चाचणी जिंकून जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला. सुमारे २० वर्षांनंतर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघाला अजिंक्यपद मिळवून देताना उपउपांत्य व अंतिम सामन्यात एकेरी गटाचा सामना जिंकत मोलाची कामगिरी बजावली. तसेच या राष्ट्रीय स्पर्धेत कणकवलीची दिक्षा चव्हाण देखील महाराष्ट्राकडून सहभागी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88545 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..