केसरकर-परब भेटीने भुवया उंचावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकर-परब भेटीने भुवया उंचावल्या
केसरकर-परब भेटीने भुवया उंचावल्या

केसरकर-परब भेटीने भुवया उंचावल्या

sakal_logo
By

44301
सावंतवाडी ः संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मंत्री दीपक केसरकर. बाजुला अजय गोदावळे आदी.(छायाचित्र ः रुपेश हिराप)


केसरकर-परब भेटीने भुवया उंचावल्या

सावंतवाडीचे चित्र; विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन

सावंतवाडी, ता. १९ ः संजू परब यांच्या हातून चांगले काम घडो. वेगवेगळ्या पदाची त्यांना संधी मिळो. माझा पूर्ण पाठिंबा येणाऱ्या काळात त्यांना राहील, अशा शुभेच्छा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिल्या. येथील माजी नगराध्यक्ष परब यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. याला खुद्द श्री. केसरकर यांनी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरला. परब यांनीही त्यांना यथोचित मानसन्मान देत मंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या.
येथील पालिकेवरची तब्बल २३ वर्षांची केसरकरांची सत्ता काबीज करत नगराध्यक्ष म्हणून परब भाजपच्या कमळ निशाणीवर निवडून आले होते. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळ अनेक आरोप प्रत्यारोप परब आणि केसरकरांनी एकमेकांवर केले. चांदा ते बांदा या योजनेतून शहरात राबवण्यात आलेल्या विकास प्रकल्पाच्या भ्रष्टाचाराबाबतही परब यांनी उपोषण केले होते. मात्र, आज परब यांच्या वाढदिवशीच योगायोगाने शहरात आलेल्या मंत्री केसरकरांनी त्यांची भेट घेत दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या. आपले आणि परब यांचे चांगले संबध आहेत. त्यांनी निवडणुकीतही मदत केली आहे. त्यांच्या घराच्यांशी माझे संबंध आहेत. त्यामुळे आम्ही लवकरच एकत्र काम करु. सावंतवाडी शहराचा विकास व्हावा, यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर, बंटी पुरोहीत आदी उपस्थित होते.
-------------
चौकट
दिखाव्यासाठी जवळ केले नाही
संजूला खूप दिवसांनी जवळ घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे बरे वाटले. दिखाव्यासाठी त्यांना जवळ घेत नाही तर या पुढच्या काळात पूर्ण पाठिंबा त्यांना राहील. लवकरच सगळे वाद मिटून एकत्र काम करू, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88550 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..