खेडमध्ये गोविंदा रे गोपाळाचा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडमध्ये गोविंदा रे गोपाळाचा गजर
खेडमध्ये गोविंदा रे गोपाळाचा गजर

खेडमध्ये गोविंदा रे गोपाळाचा गजर

sakal_logo
By

rat१९p४०.jpg-
४४३४३
खेड ः शिवाजी चौक येथे मनसेच्या दहीहंडीला सलामी देताना पथक.
----------
खेडमध्ये गोविंदा रे गोपाळाचा गजर
दहीहंडी उत्साहात ; पथकांसह नागरिकांचा उत्साह
खेड, ता. १९ : मच गया शोर सारी नगरी रे, गोविंद आला रे आला अशी आरोळी देत खेड तालुक्यात गोविंदा पथकांनी चित्तथरारक मानवी मनोरे रचून दहीहंडी उत्सव साजरा केला. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता सुरू झालेला गोविंदाचा उत्साह शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. खेड शहर आणि परिसरात गोविंद पथकांनी अनेक लहानमोठ्या हंड्या फोडून दहीदुधाची लयलूट केली.
तीनबत्ती नाका येथील शिवसेना शिंदे गटाची दहीहंडी, छत्रपती शिवाजी चौक येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हंडी आणि खांबतळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसची दहीहंडी या तिन्ही दहीहंड्या यावर्षी गोविंदा प्रेमींसाठी मुख्य आकर्षण ठरल्या. रात्री उशिरापर्यंत या तिन्ही हंड्या फोडण्यात आल्या नव्हत्या.
दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सार्वजनिक सणांवर निर्बंध असल्याने दोन वर्षे दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. शासनाने घालून दिलेल्याअटी शर्थीचे पालन करून दहीहंडी उत्सव साजरा करावा लागला होता. यावर्षी दहीहंडी सणावरील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने खेडमध्ये ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्साह पाहावयास मिळाला. खेड शहरातील हनुमान मंदिर येथे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता मानाची हंडी फोडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली. सकाळपासूनच लहान मुलांची गोविंदा पथके रस्त्यावर दंगा करताना दिसत होती. शहरातील घरासमोर बांधलेल्या छोट्या मोठ्या हंड्या फोडण्यात गोविंदा पथकांना ऐक वेगळाच आनंद मिळत होता.

चौकट
ग्रामीण भागातही उत्साह
खेड शहराप्रमाणे भरणे नाका, महामार्गावरील आवाशी- लोटे, शिवतर, चाकाळे, भोस्ते या ठिकाणी देखील दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोटे पंचक्रोशीत दहीहंडी उत्सवासाठी हजारो उत्सवप्रेमी एकत्र आले होते. हंडी फोडण्यासाठी चित्तथरारक मानवी मनोरे रचना डोळ्यांचे पारणे फिटत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88593 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..