मालगुंडला दहीकाला उत्सव जल्लोषात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालगुंडला दहीकाला उत्सव जल्लोषात
मालगुंडला दहीकाला उत्सव जल्लोषात

मालगुंडला दहीकाला उत्सव जल्लोषात

sakal_logo
By

rat19p37.jpg-
L44323
रत्नागिरी : जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक संस्थेतर्फे फोटोग्राफी दिनी कॅमेऱ्याचे पूजन करताना अध्यक्ष अजय बाष्टे.
----------
जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक
संस्थेतर्फे फोटोग्राफी दिन साजरा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला. यानिमित्त एमआयडीसी विश्रामगृहामध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्ष तथा ज्येष्ठ फोटोग्राफर अजय बाष्टे आणि पदाधिकारी, सदस्यांनी कॅमेऱ्याचे पूजन केले. त्यानंतर दिवंगत फोटोग्राफर्सना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेतर्फे काही महिन्यांत फोटोग्राफर्ससाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. फोटोग्राफर्सच्या हितासाठी मार्गदर्शन, सेमिनार, कार्यशाळा, प्रदर्शन आदींचे आयोजन करण्याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. तसेच दहीहंडीनिमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेसंदर्भात चर्चा करण्यात आली. आपली संस्था शासनमान्य असून जिल्ह्यातील छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर्सनी संस्थेत सहभागी व्हावे, असे आवाहन अजय बाष्टे यांनी केले.
-----------
rat19p38.jpg-
44337
मालगुंड : श्री गोपाळकृष्ण मंदिर ट्रस्टच्यावतीने आयोजित श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यात दहीहंडी फोडताना श्री गोपाळकृष्ण गोविंदा पथक.
-----------
मालगुंडला दहीकाला उत्सव जल्लोषात
रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर ट्रस्टच्यावतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीकाला उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. श्री गोपाळकृष्ण गोविंद पथकाने मालगुंड बाजारपेठेत लावलेल्या ३० फूट उंचावरील दहीहंड्या फोडण्याचा मान पटकावला. त्यांचेसमवेत मालगुंड येथील कुणबी समाज गोविंदा पथकानेही दहीहंड्या फोडण्यासाठी सहभाग घेऊन आपला मोठा उत्साह दाखविला. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त गोपाळकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. एकूणच कोरोनाच्या गेल्या दोन वर्षांमुळे हा उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात होऊ शकला नव्हता, त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या दहीकाला उत्सवात बैलगाड्यांमधून सजवलेले आकर्षक चित्ररथ लक्षवेधी ठरले. दहीकाल्यात मालगुंड भंडारवाड्यातील बालगोपाळांच्या श्रीकृष्णाच्या वेशभूषा खास सजवलेल्या बैलगाड्यातून दाखविण्यात आल्या होत्या. मंडळाचे अध्यक्ष भूषण मयेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख पदाधिकारी व गोपाळकृष्ण गोविंद पथकाच्या सदस्यांनी मोठी मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88598 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..