‘बोल बजरंग बली की जय’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बोल बजरंग बली की जय’
‘बोल बजरंग बली की जय’

‘बोल बजरंग बली की जय’

sakal_logo
By

44378
सावंतवाडी ः शहरात दहीहंडी फोडताना गोविंद पथक.
44380
पडेल ः येथील दहिहंडी फोडताना गोविंदा पथक.
44335
कणकवली : शहरातील बाजारपेठ येथील दहीहंडी फोडताना बालगोपाळ. (छायाचित्र : अनिकेत उचले)
44347
खारेपाटण : शहरातील बस स्थानक येथील दहीहंडी उत्‍सवात संभाजीनगर पथकाने चार थरांची दिलेली सलामी.(छायाचित्र : रमेश जामसंडेकर)
---
ॊ‘बोल बजरंग बली की जय’

जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; डीजेच्या ठेक्यावर गोपाळकाला, दहिहंडी उत्सव

कणकवली,ता.१९ : ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजरात शहर आणि तालुक्याच्या विविध भागातील दहिहंड्या आज फोडण्यात आल्या. दिवसभर किरकोळ सरी कोसळत असल्‍याने गोविंदांनी दहिहंडी उत्‍सवात भिजण्याचाही आनंद लुटला. डिजेच्या तालावर गोविंदा रे गोपाळा, बोल बजरंग बली की जय, असे म्हणत अनेकांनी ठेका धरला. तर गोविंदावर गुलालाची आणि रंगाची उधळण लक्षवेधी ठरली.
बांदकरवाडी, तेलीआळी, बाजारपेठ, यंगस्टार मित्रमंडळ, बाजारपेठ मित्रमंडळ, हर्णेआळी, आंबेआळी, पटकीदेवी, शिवाजीनगर, पोयेकरवाडी, मधलीवाडी, नाथ पै नगर येथील दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रमांना दुपारी दोनपासून सुरवात झाली. कलमठ, जानवली, खारेपाटण, तळेरे, नांदगाव, फोंडाघाट, कनेडी आदी भागातही ठिकठिकाणी सायंकाळी सहापर्यंत हंड्या फोडल्या जात होत्या. काल (ता.१८) श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा कार्यक्रम ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांनी आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. विशेषत: ग्रामीण भागात भजन, कीर्तन, पोथीवाचन असे कार्यक्रम झाले.
----

खारेपाटणला शेकडोंची उपस्थिती

खारेपाटण : खारेपाटण शहर आणि परिसरात आज जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सोहळा उत्साहात पार पडला. सायंकाळी उशिरापर्यंत खारेपाटण पंचक्रोशीत पन्नासहून अधिक ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली. शोभायात्रेत बालगोपाळांसह युवती आणि महिलांनीही झिम्मा-फुगडी आणि लेझीमनृत्य सादर केले. गोपाळकाल्याचा मुख्य कार्यक्रम खारेपाटण बस स्थानकाच्या पटांगणात रंगला. विष्णू मंदिरामध्ये कृष्णजन्माष्टमीचा मुख्य सोहळा झाला. शहर आणि परिसरात आज ५५ ठिकाणी दहीहंडी उत्‍सव साजरा झाला. अवघे खारेपाटण शहर आज ‘गोकुळनगरी’ झाले होते. सकाळच्या सत्रात कपिलेश्वरनगर, रामेश्वरनगर, कालभैरववाडी, जैनवाडी, राऊतवाडी, जिजामातानगर, बालगोपाळ मित्रमंडळ, केदारेश्वरवाडी, माचाळवाडी, बंदरगाव येथे बालगोपाळांचा अपूर्व उत्‍साह होता. दुपारी तीननंतर दहीहंडी उत्‍सवानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यातील चलचित्र देखावे नागरिकांचे विशेष आकर्षण होते.
---
सावंतवाडीतही जयघोष
सावंतवाडी ः ''गोविंदा रे गोपाळा''च्या जयघोषात सावंतवाडीकरांनी आज येथे दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. यावेळी येथील अमेय तेंडुलकर मित्रमंडळाच्या गोविंद पथकाने शहरातील तब्बल १७ हून दहीहंड्या फोडल्या. सालईवाडा भागातील पडते यांच्या घरातून श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन सर्वजण सालईवाडा येथील संस्थानकालीन मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी आले. त्या ठिकाणी प्रथेप्रमाणे पहिली हंडी साई लाखे या गोविंदाने फोडली. मुरलीधर मंदिर, मिलाग्रीस हायस्कूल तिठा, सालईवाडा, बाजारपेठ मित्रमंडळ, बिद्रे कोल्ड्रिंक्स, आदिनारायण मंगल कार्यालय, मच्छी मार्केट, लता लॉज, जयप्रकाश चौक, गांधी चौक, विठ्ठल मंदिर, उभाबाजार, चितारआळी, नारायण मंदिर, माठेवाडा, जिमखाना मैदान, गवळीतीठा, रेणुका हॉटेल समोर आदी हंड्या फोडण्यात आल्या.
------------
देवगडात दहिहंडी
देवगड ः येथील देवगड जामसंडे शहरासह तालुक्याच्या विविध भागात आज पारंपारिक पध्दतीने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. पाऊस नसल्याने अनेकांच्या दृष्टीने सोयीचे झाले होते. गुरूवारी (ता.१८) रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम उत्साहात झाला. पारंपारिक पध्दतीने श्रीकृष्ण पूजन झाले. आज दहिहंडी उत्सव साजरा झाला. विविध मंदिरासमोर दहिहंडी कार्यक्रम झाले. तसेच येथील शहरासह ग्रामीण भागात उत्साहात दहिहंडी झाली. दहिहंडी फोडण्यासाठी बक्षिसे ठेवण्यात आली होती. काही गोविंदा पथकांनी सलामी दिली. दहिहंडी पहाण्यासाठी गर्दी झाली होती.
------------
44381
वैभववाडी ः व्यापारी मंडळाची दहीहंडी फोडताना स्थानिक पथक.

वैभववाडीतही उत्साह
वैभववाडी ः कोरोनामुळे दोन वर्ष न झालेल्या दहीहंडी उत्सवाला आज वैभववाडीत गोपाळांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेनेच्या दहीहंडी उत्सव ठिकाणी ऑर्केस्ट्राची धुम होती. दुपारनंतर बाजारपेठेत लोकांची गर्दी वाढू लागली. भाजप, शिवसेना, व्यापारी मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थ अशाप्रकारे चार दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी उपस्थिती लावीत उत्सवाला शुभेच्छा दिल्या.
--
44382
कुडाळ ः दहीहंडीचे उद्‌घाटन करताना आमदार वैभव नाईक. शेजारी संजय पडते, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट आदी.


कुडाळात गोविंदांचा थरार
दहीहंडी उत्सव रंगतदार; डिजे, नृत्याविष्कारासह आकर्षक रोषणाई

कुडाळ, ता. १९ ः गोविंदा रे गोपाळा, बोल बजरंग बली की जयच्या नामघोषात तालुक्यात जन्माष्टमी आणि दहीहंडी सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी डिजेच्या तालावर विविध नृत्याविष्कार, आकर्षक रोषणाई, पाण्याची सतत बरसात या विविध आकर्षणासह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा सन्मान करण्यात आला.
शहरात लक्ष्मीनक्षत्र टॉवरसमोर २०० हुन अधिक सदस्य असणाऱ्या हेल्प ग्रुप कुडाळने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हेल्प ग्रुपचे हे १८ वे वर्ष आहे. हा ग्रुप दरवर्षी दहीहंडी उत्सव वेगळ्या पध्दतीने साजरा करतो. माजी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान गेली १८ वर्षेही केला जात आहे. या उत्सवात राजापूर, वेताळबाबर्डे, कणकवली येथील महिला गोविंदा पथक, तुळसुली येथील लाठीकाठीसह विविध पारंपरिक लोककला, वेतोरे येथील सिंधुरत्न ३५ महिलांचे ढोलपथक होते. याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले.
कुडाळ युवासेनेने दहिहंडी उत्सव येथील शिवसेने शाखेकडे आयोजित केला होता. याचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाप्रमुख संजय पडते, अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जयभारत पालव, योगेश धुरी, संदीप म्हाडेश्वर, रुपेश पावसकर, राजू गवंडे, राजन नाईक, संजय भोगटे, संतोष शिरसाट, किरण शिंदे, उदय मांजरेकर उपस्थित होते. साई कला-क्रीडा मंडळ पिंगुळी पुरस्कृत आणि दहिहंडी मित्र मंडळ पिंगुळीच्यावतीने पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले होते. विधीतज्ज्ञ संग्राम देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, विकास कुडाळकर, विजय दळवी, अविनाश वालावलकर, गंगाराम सडवेलकर, मंगेश चव्हाण, दीपक गावडे, बाबल गावडे, अजय आकेरकर, राजन पांचाळ, अमित तेंडुलकर आदी उपस्थित होते. गुलमोहर हॉटेलसमोर दहीहंडीचे आयोजन माजी नगरसेवक सुनील बांदेकर आणि युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट यांच्यावतीने केले होते. वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर, हुमरमळा युवासेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव, शाखा प्रमुख रमेश परब, अतुल बंगे मित्रमंडळ आणि युवासेना, शिवसेना आयोजित यंदाही सांस्कृतिक कार्यक्रम आणि ज्येष्ठांना गौरविण्यात आले. आमदार नाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहून कुडाळ-मालवण मतदारसंघातील तमाम जनतेच्या सन्मानास पात्र ठरल्याने त्यांचा निष्ठा गौरव सन्मान सोहळा झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88635 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..