गुळदुवेत चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळदुवेत चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद
गुळदुवेत चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद

गुळदुवेत चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद

sakal_logo
By

swt२०१.jpg
४४४४९
गुळदुवेः ज्ञानदीप वाचनालय आयोजित कार्यक्रमात गुणवंत मुलांचा सत्कार करताना मान्यवर. (छाया ः धनश्री मराठे)

गुळदुवेत चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद
''ज्ञानदीप''चे आयोजन ः ५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. २० ः ज्ञानदीप वाचनालय, गुळदुवे येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश धर्णे यांनी केले. तर स्वागत संस्थेचे अध्यक्ष फटू धर्णे यांनी केले. कार्यवाह अरुण धर्णे यांनी ज्ञानदीप वाचनालयाच्या स्थापनेपासूनचा इतिहास, वाचनालयातर्फे आयोजित कार्यक्रम-उपक्रम यांची माहिती दिली. तसेच वाचनालय कार्यकारिणीत आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी सहभागी होऊन सहकार्य केले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चित्रकला स्पर्धेत एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापूर्वी घेतलेल्या निबंधलेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. गुळदुवे गावातून मार्च २०२२ च्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे मराठे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. एखादी संस्था सुरू करणे सोपे असते; मात्र सातत्य राखून ती सांभाळणे कठीण असते. गुळदुवे या छोट्याशा गावाने वाचनालयाचा सांस्कृतिक ठेवा सांभाळला आहे, असे सांगत वाचनालयाच्या इमारत बांधकामाकरिता शासकीय मदत मिळवून देईन, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा पहिला सूर्य पाहिलेली गावातील सर्वात ज्येष्ठ वयोवृध्द व्यक्ती राघोबा ऊर्फ नाना शेटकर यांचा शाल, श्रीफळ व धोतरपान देऊन वाचनालयाचे अध्यक्ष धर्णे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अरुण धर्णे यांनी आभार मानले.
...................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88731 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..