साळिस्तेतील रांबाडे कुटुंबीयांची तिसरी पिढी गणेशमूर्ती कलेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळिस्तेतील रांबाडे कुटुंबीयांची 
तिसरी पिढी गणेशमूर्ती कलेत
साळिस्तेतील रांबाडे कुटुंबीयांची तिसरी पिढी गणेशमूर्ती कलेत

साळिस्तेतील रांबाडे कुटुंबीयांची तिसरी पिढी गणेशमूर्ती कलेत

sakal_logo
By

swt202.jpg
44451
साळिस्ते ः रांबाडे कुटुंबीयांची तिसरी पिढी गणेशमूर्ती साकारताना दिसत आहे. (छायाचित्र : एन. पावसकर)

रांबाडेंची तिसरी पिढी गणेशमूर्ती कलेत
साळिस्तेत गणेशशाळा; मातीच्या मूर्तींची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ः एकीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना मागणी वाढत असताना कणकवली तालुक्यातील साळिस्ते-रांबाडेवाडीतील संतोष रांबाडे यांची गणेशशाळा मात्र याला अपवाद ठरली आहे. त्यांच्याकडे सर्व गणेशमूर्ती मातीच्या असून, त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे.
साळिस्ते येथील रांबाडे यांच्या गणेशमूर्ती शाळेत विविध भागातील ६० गणेशमूर्ती आहेत. विशेष म्हणजे या सर्व मूर्ती मातीच्या आहेत. दीड फुटापासून ते पाच फुटांपर्यंत उंची असलेल्या या मूर्ती आकर्षकरित्या साकारल्या आहेत. याबाबत माहिती देताना श्री. रांबाडे म्हणाले की, आमचे बाबा (कै.) बाळकृष्ण रांबाडे यांनी गणेशमूर्ती शाळेला सुरुवात केली. त्यांना मदत करत आम्ही ही सेवा पुढे सुरु ठेवली. तर आता माझे मुलगे शुभम आणि सूरज यांनीही या कलेचा श्रीगणेशा केला आहे. आमच्या या शाळेत बांदिवडे, कुनकवन, शिडवणे, तळेरे आणि साळिस्ते येथील 60 गणेशमीर्ती आहेत; मात्र यातील एकही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही. महागाई दरवर्षीच होते; मात्र ग्रामीण भागात या कलेकडे सेवा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे मूर्तीचे ठराविक मूल्य मागितले जात नाही. दरम्यान, यावर्षी पाच फुटांची मूर्ती रांबाडे कुटुंबीयांनी साकारली असून, गणेशोत्सव आठ दिवसांवर आल्याने काम युध्दपातळीवर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88732 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..