प्रश्नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण
प्रश्नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

प्रश्नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat20p2.jpg-
44442
रत्नागिरी : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेतीला बक्षीस देताना प्रा. चिंतामणी दामले.
-------------
अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालयात
प्रश्नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण
रत्नागिरी : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष समितीतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम श्रावणी कुलकर्णी (बारावी वाणिज्य); द्वितीय ऋतुजा बिऱ्हाडे (बारावी वाणिज्य); तृतीय वेद पुरोहित (बारावी विज्ञान) यांनी यश मिळवले. स्पर्धेत भारताचा स्वातंत्र्यलढा आणि गेल्या ७५ वर्षातील भारताची कला, क्रीडा, साहित्य, संशोधन, संरक्षण इत्यादी क्षेत्रातील अभिमानास्पद कामगिरी यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका प्रा. अस्मिता कुलकर्णी, प्रश्नमंजुषा समिती समन्वयक प्रा. तगारे, सर्व विभाग प्रमुख, महिला विकास कक्ष समितीचे सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
--------------
rat20p3.jpg-
L44443
रत्नागिरीः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात कीर्तन सादर करताना दुर्गा केतकर.
----------
‘अभ्यंकर’मध्ये कीर्तन, पथनाट्य, समूहगीत गायन
रत्नागिरी : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कीर्तन, पथनाट्य, भाषणे आणि समूहगीत गायन आदी सांस्कृतिक कार्यक्रम केले.
सामूहिक राष्ट्रगीत गायनाने या कार्यक्रमाला सुरवात झाली. उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मनोगत व्यक्त करून कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी झटणारे विद्यार्थी व शिक्षक यांचे महत्त्व समजावून दिले. या वेळी पर्यवेक्षिका प्रा. कुलकर्णी, सर्व विभाग प्रमुख, सहकारी शिक्षक उपस्थित होते. दुर्गा केतकर हिने देशभक्तीपर स्फूर्तिदायक कीर्तन सादर केले. वेद पुरोहितने तबला, आदित्य पंडीतने संवादिनी, तर प्रथम सडकरने पखवाजसाथ होती. नंतर एनएसएस विभागाने पथनाट्य सादर केले. सानिया योगी हिने स्वातंत्र्यवीर सावरकर तर पूर्वा दामले हिने लोकमान्य टिळक यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. डी. आर. वालावलकर यांनी केले.
-----------
rat20p5.jpg-
44445
रत्नागिरी : स्वगृही सेवा संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना संचालिका वीणा लेले.
-----------
स्वगृही सेवा संस्थेतर्फे रक्तदान शिबिर
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुक्यातील शिरगाव येथील स्वगृही सेवा संस्थेने शिरीषालय वृद्ध संकुल येथे जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात परिसरातील १० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिरगाव मत्स्य महाविद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक, विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले. रक्तदानाच्या निमित्ताने माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी सदिच्छा भेट दिली. स्वगृही सेवा संस्थेच्या संचालिका श्रीमती वीणा लेले यांनी आभार मानले.
.......
rat20p4.jpg-
44444
रत्नागिरी : संस्कार भारती आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने आयोजित देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करताना कलाकार.
----------
संस्कार भारतीतर्फे जय भारता कार्यक्रम
रत्नागिरी : संस्कार भारती, दक्षिण रत्नागिरी समिती आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वर लहरी प्रस्तुत जय भारता हा देशभक्तीपर गीतांचा सदाबहार कार्यक्रम रंगला. कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात कार्यक्रम झाला. याप्रसंगी कलाकार पांडुरंग बर्वे व सहकलाकारांनी कार्यक्रम सादर केला. या वेळी ए मेरे वतन, जिंदगी मौत, ने मजसी ने, देश हीच माता, सरणार कधी रण, सैनिक हो, शूर आम्ही, वेडात मराठे, उधळीत शतकिरणे, हे राष्ट्र देवतांचे, जयोस्तुते, उष: काल होता होता यासह अनेक देशभक्तीपर गीते सादर झाली. यामध्ये स्वरलहरी संस्थेचे गायक कलाकार कश्मिरा सावंत, अंजली लिमये, अभिजीत भट, नरेंद्र रानडे यांनी सुरेख गायन केले. सुरेख निवेदन मीरा भावे यांनी केले. पांडुरंग बर्वे (तबला), राजू किल्लेकर (किबोर्ड), शिवा पाटणकर (ऑक्टोपॅड), वरद सोहनी (हार्मोनियम) यांनी संगीतसाथ केली. कलाकारांचा सन्मान संस्कार भारतीच्या समिती अध्यक्ष श्रुती दात्ये, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88751 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..