खेड-अंतरिक्ष आणि तार्‍यांचे गुढ विद्यार्थ्यांनी अनुभवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-अंतरिक्ष आणि तार्‍यांचे गुढ विद्यार्थ्यांनी अनुभवले
खेड-अंतरिक्ष आणि तार्‍यांचे गुढ विद्यार्थ्यांनी अनुभवले

खेड-अंतरिक्ष आणि तार्‍यांचे गुढ विद्यार्थ्यांनी अनुभवले

sakal_logo
By

-rat१८p९.jpg
४३९३१
ः खेड ः जीएमआरटी पुणेचे डॉ. यशवंत गुप्ता यांनी डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज् ट्रस्टच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
-------------
विद्यार्थ्यांनी अनुभवले अंतरिक्ष आणि ताऱ्‍यांचे गुढ

डॉ. गुप्तांचे व्याख्यान; विज्ञान महोत्सवांतर्गत कार्यक्रम
खेड, ता. २० ः श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण या संस्थेतर्फे विज्ञानभारतीच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विज्ञान महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये विज्ञानविषयक विविध स्पर्धा शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, वैज्ञानिक प्रकल्प, कार्यशाळा, विज्ञानविषयक चित्रपटांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. डेरवण विज्ञान महोत्सवाअंतर्गत दर शनिवारी विज्ञानातील तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्यानमाला सुरू केली आहे.
नुकतेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च संचलित नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे संचालक डॉ. यशवंत गुप्ता यांनी डेरवण इंग्रजी माध्यम शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना Reaching out to the stars ः a journey through the Universe या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात डॉ. गुप्ता यांनी डोळ्यांना दिसणारी आकाशगंगा आणि दुर्बिणीतून दिसणाऱ्‍या आकाशगंगा, त्या पाहण्यासाठी मोठ्या दुर्बिणींची आवश्यकता, दुर्बिणीतून एकाच आकाशगंगेच्या किंवा तार्‍यांच्या मिळणाऱ्‍या वेगवेगळ्या प्रतिमा याची माहिती दिली. तसेच भारतीय खगोल शास्त्रज्ञांचे योगदान व अंतरिक्षाचे संशोधन करणाऱ्‍या प्राचीन ते आधुनिक दुर्बिणींच्या विकासाच्या प्रवासावरती त्यांनी प्रकाश टाकला.
...
चौकट
हबल व जेम्सबेव या दुर्बिणींची वैशिष्ट्ये
रेडिओ दुर्बिणींच्या कार्यक्षमतेत अडथळा निर्माण करणारे पृथ्वीच्या वातावरणातील घटक आणि ते टाळण्यासाठी उपग्रहावर-सॅटेलाईटवर दुर्बिण बसवून पृथ्वीच्या वातावरणाबाहेर ठेवलेल्या दुर्बिणींची माहिती तसेच हबल व जेम्सबेव या दुर्बिणींची वैशिष्ट्येही त्यांनी सांगितली.