मातीशी समरस होण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातीशी समरस होण्याची गरज
मातीशी समरस होण्याची गरज

मातीशी समरस होण्याची गरज

sakal_logo
By

44486
कुंदे ः कुडाळ बिडीओ विजय चव्हाण यांचा सत्कार करताना सरपंच सचिन कदम आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

मातीशी समरस होण्याची गरज

विजय चव्हाण ः कुंदे येथे कृषी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः आजचा युवक मातीशी समरस झाला पाहिजे. शेतीकडे वळला पाहिजे. शेतीतूनच हरितक्रांती घडणार आहे. यासाठी तरुण पिढीला या शेतीक्षेत्राकडे वळविणे आवश्यक आहे. समाज चांगला घडविण्यासाठी संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम करूया, असे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी कुंदे येथे कृषीमेळाव्यात केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त कुंदे ग्रामपंचायतीच्या सभागृहात कृषी मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच सचिन कदम, किर्लोस विज्ञान केंद्राचे डॉ. विलास सावंत, उपसरपंच सुशील परब, जिल्हा बँक विकास अधिकारी संजय परब, मधुकर राणे, रमेश परब, कसाल विकास संस्था चेअरमन गटसचिव नारायण आचरेकर, तालुका कृषी अधिकारी आर. एम. चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सानप, ग्रामसेवक आर. आर. वनकर, मुख्याध्यापिका राजश्री कदम, शिक्षिका वर्षा परब, अर्चना कदम, अक्षता पारकर आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे. आजची तरुण पिढी शेती क्षेत्रापासून दूर होत चालली आहे. तरुणाई मोबाईलच्या विळख्यात सापडलेली दिसत आहे. भविष्यात हे चित्र बदलले पाहिजे. आता नोकऱ्या मिळणे दुरापास्त झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीक्षेत्रात क्रांती केली पाहिजे. यासाठी तरुण पिढीला या शेतीक्षेत्राकडे वळविणे आवश्यक आहे. शेतीमध्ये होणाऱ्या नवनवीन बदलांबाबत आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्र निश्चितच सहकार्य करील. महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायकडे वाटचाल केली पाहिजे. देश स्वातंत्र्य होण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांमुळे आनंदीमय जीवन जगत असून त्यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवा.’’ कुंदे शाळा नं १ च्या मुलांनी पथनाट्यातून स्त्रीवरील अन्याय थांबविण्याचा संदेश दिला. यात स्वरा कदम, सलोनी पवार, कोमल पवार, मनस्वी सावंत, इश्वरी सावंत, दीक्षा पवार, प्रजा जंगले, अमिषा परब, ओम परब, आदित्य राणे, पूर्वा परब हे विद्यार्थी सहभागी झाले. त्यांना मुख्याध्यापिका राजश्री कदम, शिक्षिका वर्षा परब, अर्चना कदम, अक्षता पारकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व बालकलावंतांचे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी कौतुक केले.
...............
चौकट
कुंदेवासीयांतर्फे बिडीओंचा सत्कार
महाआवास अभियान २ ग्रामीण २०२१-२२ अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये कुडाळ तालुक्याने वर्चस्व राखले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापनामध्ये कुडाळ तालुका प्रथम आला. राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गतही तालुक्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. कुडाळ येथील अभियंता स्नेहा नागदे यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर झाला आहे. तालुक्याच्या या यशाबद्दल बिडीओ चव्हाण यांचा कुंदे गावाच्यावतीने सरपंच सचिन कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.