रत्नागिरी-निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-निधन वार्ता
रत्नागिरी-निधन वार्ता

रत्नागिरी-निधन वार्ता

sakal_logo
By

-rat19p29.jpg
2L44300
- भाई कासार
----------
व्यापारी भाई कासार यांचे निधन

रत्नागिरी ः तालुक्यातील पाली बाजारपेठ येथील किराणा व जनरल स्टोअर्स, मेडिकल दुकान व्यावसायिक चंद्रकांत भगवान गराकटे तथा भाई कासार (वय ७३) यांचे आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर पाली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भाई हे गेले काही दिवस आजारी होते. पालीसह दशक्रोशीत किराणा, प्रोजेक्टर, कॅसेट्स, ऐस.टी.डी. बुथ, मेडिकल व्यावसायिक म्हणून ते गेली पन्नास वर्षे ग्राहकांना त्यांच्या विनम्र व चौविस तास तत्पर सेवेमुळे परिचित होते. पाली बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळातही ते स्थापनेपासून सक्रीय सहभागी होते. रत्नागिरी केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी गुरुनाथ गराकटे यांचे ते वडील होत. भाई कासार यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे, पुतण्या असा परिवार आहे.
------