रत्नागिरी-रत्नागिरीत दहीकाल्याचा थरार सात थरावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीत दहीकाल्याचा थरार सात थरावर
रत्नागिरी-रत्नागिरीत दहीकाल्याचा थरार सात थरावर

रत्नागिरी-रत्नागिरीत दहीकाल्याचा थरार सात थरावर

sakal_logo
By

-rat२०p१२.jpg
L44504
-रत्नागिरी ः उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठा आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये ७ सेकेंदात ५ थर लावणारे दत्तप्रासादिक घुडेवठार पथक.
------
-rat२०p१३.jpg
44505
- विजेत्या दत्तप्रासादिक गोविंदा पथकाला चषक प्रदान करताना मान्यवर.
------
-rat२०p१४.jpg
44515
- रत्नागिरी ः राष्ट्रवादी पुरस्कृत दहीहंडीमध्ये ७ थर लावणारे आडिवरे येथील महाकाली गोविंदा पथक.
------
-rat२०p१५.jpg
L44498
- महाकाली गोविंदा पथकाला चषक देताना मान्यवर.
--------------------
गोविंदा भन्नाट; थरांचा थरथराट!

रत्नागिरीत दहीकाल्याचा थरार सात थरावर; दत्तप्रासादिक, महाकाली पथकाची चमक, बक्षीसांची लयलूट,
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : प्रतिष्ठेच्या ठरलेल्या राजकीय दहीहंड्यांच्या थरांचा चांगलाच थरार शहरवासीयांना पहायला मिळाला. उद्योगमंत्री उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठान आयोजित हंडीचा विजेता घुडेवठार दत्तप्रसादिक गोविंदा पथक ठरले. त्यांनी अवघ्या ७ सेकंदामध्ये ५ थर लावण्याचा विक्रम केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसची दहीहंडी सात थर लावलेल्या महाकाली गोविंदा पथक अडिवरे विजेते ठरले. रात्री उशिरापर्यंत हा थरार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याने शहरवासीयांनी सर्वच हंडीच्या ठिकाणी चांगलीच गर्दी करत या विविध कार्यक्रमांचा आनंद घेतला.
सायंकाळी सहानंतर गोविंदा पथकांची टोळ्या विविध हंडीच्या ठिकाणी जाऊन पाच थरांची सलामी देत बक्षिसांची लुट करत होते. सर्वांत कमी वेळेत थर लावणारा संघाला विजेते घोषित करण्यात येत होते. उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव यावर्षी मांडवी ऐवजी प्रमोद महाजन क्रीडांगणावर घेण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने मैदानावर चांगलीच गर्दी झाली होती. या स्पर्धेत २१ संघ सहभागी झाले. मात्र, ७ सेकंदात ५ थराची सलामी देणारा घुडेवठार येथील दत्तप्रासादिक गोविंदा पथक विजयी ठरले आणि २१ हजाराचे बक्षीस मिळविले. त्याला टक्कर दिली, ती खालचा फगरवठार येथील गोविंदा पथकाने. त्यांनी ८ सेकंदामध्ये पाच थर लावले. त्यामुळे हे पथक उपविजेता ठरले. त्यांना ११ हजाराचे बक्षिस मिळाले.
आठवडा बाजार येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत दहीहांडी उत्सवालाही चांगला प्रतिसाद मिळाला. येथे १५ संघांची नोंद झाली. मात्र, त्यात सर्वांत जास्त म्हणजे ७ थर लावण्याचा विक्रम केलेले आडिवरे येथील महाकाली गोविंदा पथक विजयी ठरले.
..
एक नजर..
श्री प्रतिष्ठानच्या स्पर्धेत २१ संघ झाले सहभागी
घुडेवठार येथील दत्तप्रासादिक पथक विजयी
फगरवठार येथील गोविंदा पथक उपविजेते
राष्ट्रवादी पुरस्कृत दहीहांडी उत्सवही रंगला
महाकाली गोविंदा पथक विजयी; ७ थर लावले
..
चौकट
नागरिकांमध्येही प्रचंड उत्साह
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी होती. कोरोना साथ नियंत्रणात असल्याने शासनाने सर्व निर्बंध हटविले आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर जिल्ह्यात होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी गोविंद पथकांसह नागरिकांमध्येही प्रचंड उत्साह दिसला.
..
चौकट
चोख पोलिस बंदोबस्त
शहरात साळवी स्टॉप, मारूती मंदिर, एसटी बसस्थानक, आठवडा बाजार आणि प्रमोद महाजन क्रीड संकुलामध्ये सार्वजनिक दहीहंड्या बांधल्या होत्या. या हंड्या फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांना निमंत्रित केले होते. दुपारपासूनच या ठिकाणी डीजे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला, मच गया शोर सारी नगरी रे... आदी गाण्यांनी हंडीचे वातावरण तयार झाले होते. मोठ्या क्रेन आणून त्याला सजविलेल्या दहीहंड्या लटकविल्या होत्या. मुख्य मार्गावर आणि मार्गालगत या हंड्या असल्याने पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.