‘स्टेपिंग स्टोन’मध्ये गोकुळाष्टमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्टेपिंग स्टोन’मध्ये गोकुळाष्टमी
‘स्टेपिंग स्टोन’मध्ये गोकुळाष्टमी

‘स्टेपिंग स्टोन’मध्ये गोकुळाष्टमी

sakal_logo
By

44187
सावंतवाडी ः येथील गोकुळाष्टमी उत्सवात सहभागी ‘स्टेपिंग स्टोन’चे विद्यार्थी, शिक्षक.

‘स्टेपिंग स्टोन’मध्ये गोकुळाष्टमी
सावंतवाडी, ता. २० ः येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला. याप्रसंगी शाळेचे संचालक रुजूल पाटणकर, सौ. काश्मिरा पाटणकर आणि मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांच्या हस्ते कार्यक्रमाला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांना अनुक्रमे इंग्रजी व मराठी भाषेत गोपाळकाला म्हणजे काय? तसेच जन्माष्टमी व दहीहंडीचे महत्त्व व त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गोकुळाष्टमीवर आधारित गीत सादर केले. पहिली, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडीची प्रथा कशी सुरु झाली? हे नाट्य प्रदर्शनाद्वारे प्रदर्शित केले. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी या सणावर आधारित नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली.