‘प्रोत्साहनपर रक्कम गणेशोत्सवापूर्वी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रोत्साहनपर रक्कम
गणेशोत्सवापूर्वी द्या
‘प्रोत्साहनपर रक्कम गणेशोत्सवापूर्वी द्या

‘प्रोत्साहनपर रक्कम गणेशोत्सवापूर्वी द्या

sakal_logo
By

44455
बाळू सावंत

‘प्रोत्साहनपर रक्कम
गणेशोत्सवापूर्वी द्या
बांदा, ता, २० ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नियमित कर्जाची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून ही रक्कम गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी बांदा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्षच होत होते; मात्र या सरकारने कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम जाहीर करून शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय दिला आहे. गणेश चतुर्थी हा मोठा उत्सव असल्याने या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रोत्साहन रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी. तसेच यासाठी शेतकऱ्यांना जाचक निकष न लावता सर्वसमावेशक व सरसकट रक्कम अदा करण्यात यावी, असे सावंत यांनी म्हटले आहे.