चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून 25 ला सोडणार पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून 25 ला सोडणार पाणी
चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून 25 ला सोडणार पाणी

चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून 25 ला सोडणार पाणी

sakal_logo
By

कोळकेवाडी धरणः फोटो येत आहे
..
कोळकेवाडी धरणातून २५ ला सोडणार पाणी

चिपळूण, ता. २० ः तालुक्यातील कोळकेवाडी धरणातील अवजल सोडण्याची दुसरी चाचणी गुरुवारी (ता. २५) घेण्यात येणार आहे. पूरनियंत्रणाचा एक भाग म्हणून ही चाचणी आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत धरणाचे वक्रद्वारे उघडून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी बोलादवाडी नाल्यातून वाशिष्ठी नदीत सोडून त्याच्या प्रवाह व पातळीचा अभ्यास करण्यात येणार आहे.
वाशिष्ठी नदीपात्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. या कालावधीत धरणाखालील मोजे कोळकेवाडी, नागावे, अलोरे या नजीकच्या गावातील नागरिकांनी बोलादवाडी नाल्यामध्ये जाऊ नये. गुरे-ढोरे इ. नालापात्रात जाणार नाहीत, याची खबरदारी घेऊन जीवित वा वित्तहानी टाळावी. वाशिष्ठी नदी काठावरील मौजे पेढांबे, खडपोली, पिंपळी खुर्द, पिंपळी बुद्रुक, सती, खेर्डी आदी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी आणि नगरपालिका, चिपळूण हद्दीतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोयना सिंचन विभाग, कोयनानगर कार्यालयाकडून करण्यात आले आहे.