वक्तृत्व स्पर्धेत नीलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्तृत्व स्पर्धेत नीलचे यश
वक्तृत्व स्पर्धेत नीलचे यश

वक्तृत्व स्पर्धेत नीलचे यश

sakal_logo
By

44541
ओरोस ः नील बांदेकर याला गौरविताना मान्यवर.

वक्तृत्व स्पर्धेत नीलचे यश
बांदा ः स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते चौथीच्या गटात जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील चौथीचा विद्यार्थी नील बांदेकर याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानंतर तालुकास्तरावही प्रथम क्रमांक प्राप्त करून त्याने सावंतवाडी तालुक्यातून जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते. ओरोस येथील शरद कृषी भवनात पार पडलेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाच्या सांगता समारोपामध्ये त्याला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन केले. नीलला केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, शीतल गवस, जागृती धुरी, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, रंगनाथ परब, जे. डी. पाटील, प्रशांत पवार, गोपाळ साबळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
--
44540
वेंगुर्ले ः मुक्तांगणने केलेली ‘पुस्तकहंडी’.

वेंगुर्लेत अनोखी ‘पुस्तकहंडी’
वेंगुर्ले ः इंटरनेटच्या युगात प्रगतीचे बीज रुजत असताना मोबाईलच्या माध्यमातून विघातक गोष्टींच्या विळख्यात तरुण आणि लहान मुलेही अडकत आहेत. समाजाकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुक्तांगणमध्ये गेली अनेक वर्षे वाचन संस्कार रुजावा, या हेतूने पुस्तकहंडी साजरी करत असल्याचे प्रतिपादन मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर यांनी केले. दरवर्षीप्रमाणे येथील मुक्तांगणमध्ये कृष्णाष्टमीला पुस्तकहंडी साजरी करण्यात आली. छोट्या मुलांनी कृष्ण, राधा आणि त्यांचे सवंगडी यांची वेशभूषा साकारून पुस्तकरुपी हंडीतून एकमेकांना ज्ञानाचा वसा दिला. तत्पूर्वी मुलांनी श्रीकृष्णाची भजने सादर केली. या कार्यक्रमाला मुक्तांगण संचालिका मंगल परुळेकर, सहाय्यक शिक्षिका निला करंगुटकर, गौरी माईणकर आदी उपस्थित होते.
--
44678
वैभववाडी ः गौरव पदयात्रेत सहभागी काँग्रेसचे पदाधिकारी.

वैभववाडीत काँग्रेसची पदयात्रा
वैभववाडी ः येथील काँग्रेसने शहरात पदयात्रा काढली. कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या पदयात्रेत तालुकाध्यक्ष दादामियाँ पाटणकर, महिला अध्यक्ष मीना बोडके, युवक अध्यक्ष भालचंद्र जाधव, आनंद पवार, बाळा सुतार, दिलीप नारकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. येथील आंबेडकर भवनातुन ही पदयात्रा सुरू झाली. आंबेडकर भवन ते दत्तमंदीर आणि दत्तमंदीर ते महाराणा प्रताप कलादालनपर्यत अशी पदयात्रा काढण्यात आली. संभाजी चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इरशाद शेख हे या पदयात्रेत सामील झाले. त्यांनी तेथे कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.
------------
44680
सावंतवाडी ः येथे राजीव गांधींना अभिवादन करताना मान्यवर.

राजीव गांधींना अभिवादन
सावंतवाडी ः येथील राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तालुका काँग्रेस कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विकास भाई सावंत, महिला काँग्रेस प्रांतिक सदस्य विभावरी सुकी, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, चंद्रकांत राणे, आनंद परुळेकर, अभय मालवणकर, संदीप सुकी, संजय लाड, आनंद कुंभार, जास्मिन लक्ष्मेश्वर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी पंतप्रधानांच्या प्रतिमेला तालुकाध्यक्ष सांगेलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला.
---
44684
खुडेद (तिवसपाडा) ः संगणक वाटप करताना श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे पदाधिकारी.

‘शिवराज्याभिषेक’तर्फे संगणक
कुडाळ ः ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्यावतीने पालघर जिल्ह्यातील दोन शाळांमध्ये संगणक वाटप करण्यात आले. यातील एक संगणक तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘आमची शाळा’ या जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात आला. संस्कृत भाषेची महती सर्वांना कळावी व त्याचा प्रसार व्हावा, यासाठी समितीचे सदस्य कृष्णा धुरी यांनी समितीची आणि समितीच्या उपक्रमाची माहिती संस्कृत भाषेमधून उपस्थितांना दिली. समितीचे पालघर जिल्ह्यामधील सफाळे येथील भूषण ठाकूर आणि तांदुळवाडी येथील धीरज पाटील उपस्थित होते. दुसरा संगणक विक्रमगड तालुक्यामधील खुडेद (तिवसपाडा) येथील आदिवासी आश्रमशाळा येथे देण्यात आला. या कार्यक्रमाला विक्रमगड तालुक्यातील पोलिस निरीक्षक सतीश जगताप आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते. समीर वारेकर, रंजन गावडे, आतिश कुशवाहा, कृष्णा धुरी यांनी सहकार्य केले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली.
...................
44685
होडावडा ः मार्गदर्शन करताना उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कृषिकन्या.

गांडुळखत निर्मितीचे प्रात्यक्षिक
वेंगुर्ले ः तालुक्यातील होडावडे येथील मंगेश माणगावकर यांच्या बागेमध्ये शेतकरी बांधवांसाठी गांडुळखत प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी उपस्थितांना गांडुळखताचे महत्त्व, खत तयार करण्याची पद्धत आदी माहिती देण्यात आली. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील कृषिकन्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी फळमाशीच्या रक्षक सापळ्याविषयी माहिती देण्यात आली. कोकणात फळमाशी आंबा, चिकू आदी फळे तसेच वेलवर्गीय भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. या माशीवर कीटकनाशकांचा परिणाम होत नसल्याने रक्षक सापळ्यांच्या मदतीने या माशीवर नियंत्रण मिळवता येते, असे माणगावकर यांनी नमूद केले. या कार्यक्रमामध्ये प्रा. डॉ. संदीप गुरव (मुळदे महाविद्यालय), डॉ. मैथिलीश सणस (वेंगुर्ले संशोधन केंद्र), अदिती नाईक (होडावडे सरपंच), अनन्या धावडे (होडावडे उपसरपंच), संदेश सावंत, सुरेखा परब आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88847 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..