भार्गवी चौगुले, प्रियंका परब प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भार्गवी चौगुले, प्रियंका परब प्रथम
भार्गवी चौगुले, प्रियंका परब प्रथम

भार्गवी चौगुले, प्रियंका परब प्रथम

sakal_logo
By

भार्गवी चौगुले, प्रियंका परब प्रथम
रंगभरण स्पर्धा ः देवगडात ''अमृतमहोत्सवा''निमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील माध्यमिक शाळांसाठी आयोजित केलेल्या रंगभरण स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात भार्गवी चौगुले, तर आठवी ते दहावीच्या गटात प्रियंका परब यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचा निकाल मुख्याध्यापक संघाचे सचिव संजीव राऊत व स्पर्धा प्रमुख माधव यादव यांनी जाहीर केला.
सविस्तर निकाल अनुक्रमे असाः पाचवी ते सातवी गट-भार्गवी चौगुले (शेठ म. ग .हायस्कूल देवगड), दीपिका राठोड (उमा पवार हायस्कूल देवगड), आदेश सावंत (मुणगे हायस्कूल), उत्तेजनार्थ कल्पक कोकरे (पडेल हायस्कूल), वैष्णवी तिर्लोटकर (मोंड हायस्कूल), प्रियंका माळी (जामसंडे हायस्कूल), आठवी ते दहावी गट-प्रियंका परब (शिरगाव हायस्कूल), तेजश्री डोळकर (गिर्ये हायस्कूल), आर्यन मोरे (तळेबाजार हायस्कूल), उत्तेजनार्थ कोमल वाडेकर (वाडा हायस्कूल), तन्मय तिवाटणे (कोळोशी हडपीड हायस्कूल), सानिका राणे (सौंदाळे हायस्कूल) यांचा समावेश आहे. स्पर्धेमध्ये तालुक्यातील २५ माध्यमिक शाळांतून २५४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातून प्रत्येक शाळांमधून पहिल्या तीन क्रमांकाची चित्रे एकत्रित करून परीक्षण करण्यात आले. यामध्ये पाचवी ते सातवीमध्ये ४४, आठवी ते दहावीमध्ये ७७ स्पर्धक होते. स्पर्धेचे परीक्षण संदीप मनोहर परब (तारामुंबरी प्राथमिक शाळा), दीपिका पालकर (जामसंडे खाकशीशाळा) या शिक्षकांनी केले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांचे तालुकाध्यक्ष दिलीप घरपणकर यांनी अभिनंदन केले. दरम्यान, या रंगभरण स्पर्धेत शिरगाव हायस्कूलमधील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88899 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..