विद्यार्थीनीचा आकस्मिक मृत्यू नापणेत आकस्मिक मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थीनीचा 
आकस्मिक मृत्यू
नापणेत आकस्मिक मृत्यू
विद्यार्थीनीचा आकस्मिक मृत्यू नापणेत आकस्मिक मृत्यू

विद्यार्थीनीचा आकस्मिक मृत्यू नापणेत आकस्मिक मृत्यू

sakal_logo
By

44581- रसिका यादव

विद्यार्थिनीचा
आकस्मिक मृत्यू
वैभववाडी, ता. २० ः नापणे-यादववाडी येथील रसिका रमाकांत यादव (वय १७) हिचा आज सकाळी आठच्या सुमारास अकस्मिक मृत्यू झाला. अस्वस्थ वाटत असल्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात येत होते. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रसिका कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयात दहावीत होती. तिने काल (ता. १९) रात्री नेहमीप्रमाणे जेवण केले. अभ्यास केला. तिला पहाटे अस्वस्थ वाटू लागले. श्वास गुदमरत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. वडील तिला रिक्षातून वैभववाडीकडे घेऊन जात होते; मात्र कोकिसरे रेल्वे फाटकादरम्यान तिचा मृत्यू झाला. तेथून तिला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर निश्चित कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले. मृत रसिकाचे वडील रमाकांत यादव शेतकरी आहेत. रसिकाच्या मागे आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.