प्रक्रिया थांबवा, अन्यथा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रक्रिया थांबवा, अन्यथा आंदोलन
प्रक्रिया थांबवा, अन्यथा आंदोलन

प्रक्रिया थांबवा, अन्यथा आंदोलन

sakal_logo
By

प्रक्रिया थांबवा, अन्यथा आंदोलन

कास्ट्राईबचा इशारा; अतिरिक्त शिक्षक समायोजनला हरकत

कणकवली,ता. २१ ः संचमान्यतेनुसार दोन वर्षांतील जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादीबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे आकाश तांबे आणि संदीप कदम यांनी हरकत घेतली आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या यादीमध्ये बरीच नावे तत्कालीन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिलेल्या अनियमित वैयक्तिक शिक्षण सेवक मान्यतांमधील शिक्षकांची आहेत. ही प्रक्रीया थांबवा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, तत्कालीन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संचमान्यतामध्ये शाळेत शिक्षकाचे पद नसता, मागासवर्गीय रोस्टर डावलून शिक्षण सेवक मान्यता दिल्या होत्या. या प्रकरणी तत्कालीन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी सदोष निर्णय दिले होते. परंतु कास्ट्राईब शिक्षक संघटनेने सत्यवान सोनवणे यांनी दिलेल्या निर्णयांवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांची अशाच प्रकारच्या अनियमित मान्यता दिल्या प्रकरणी विभागीय चौकशी शासनाने सुरू केली आहे. ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिल्यामुळे शिक्षण आयुक्तांनी या प्रकरणी पुन्हा शिक्षण संचालकांना चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी शिक्षण संचालक स्तरावर चौकशी सुरू आहे. असे असताना यामधील प्रकरणातील शिक्षकांना अतिरिक्त शिक्षक म्हणून अन्य शाळेत कसे काय समायोजन करता असा प्रश्न तांबे आणि कदम यांनी उपस्थित केला. त्यामुळे अशा शिक्षकांचे वेतन जरी सुरू झाले असले तरी त्यांच्या बाबतील निर्णय अजून प्रलंबित आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असताना अशा शिक्षकांना आपण अतिरिक्त करून शासनाची दिशाभूल करत आहात, अशी भूमिका कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने आकाश तांबे आणि संदीप कदम यांनी मांडली. तसेच काही शाळांमध्ये ज्या शिक्षकांना पद नसताना मान्यता दिल्या आहेत. त्या शिक्षकांना त्याच शाळेत ठेऊन अन्य शिक्षकांना विशेषतः मागासवर्गीय शिक्षकांना अतिरिक्त केले आहे. ही बाब शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांच्या निदर्शनास आणून दिली.
--
....तर हरकत नाही
अतिरिक्त शिक्षकांची प्रक्रिया स्थगित करून अशा शिक्षकांच्या बाबतीमध्ये शासनाकडून मार्गदर्शन घेऊ, असे आश्वासन डॉ. मुश्ताक शेख यांनी दिले होते; मात्र, जे शिक्षक नियमाप्रमाणे अतिरिक्त झालेले आहेत. त्यांचे समायोजन करायला कास्ट्राईब शिक्षक संघटनेची कोणतीही हरकत नाही, असेही आकाश तांबे आणि संदीप कदम यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88972 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..