फोंडा बाजारात वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोंडा बाजारात
वाहतूक कोंडी
फोंडा बाजारात वाहतूक कोंडी

फोंडा बाजारात वाहतूक कोंडी

sakal_logo
By

फोंडा बाजारात
वाहतूक कोंडी
फोंडाघाट ः येथील बाजारपेठेत सातत्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. कोकणातून कोल्हापूरकडे जाणारे इतर घाटमार्ग बंद असल्यामुळे सध्या फोंडाघाटातून मोठी वाहतूक सुरू झाली आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर सुरू झाला आहे. गणेशोत्सवापूर्वी खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस शाखेने लक्ष द्यावे, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
--
बोर्डवे गावाला
द्वितीय क्रमांक
कणकवली ः प्रधानमंत्री आवास योजनेत शासनाच्या महाआवास योजनेत जिल्हास्तरावर बोर्डवे ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत प्रशासनाचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे हा गौरव झाला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सीईओ प्रजित नायर, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.
---
‘ई-के.वाय.सी.
प्रक्रिया पूर्ण करा’
सिंधुदुर्गनगरी ः पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-के.वाय.सी. पूर्ण करण्यासाठी आधारकार्ड व आधार क्रमांकाशी लिंक केलेला मोबाईल नंबर घेऊन स्वत: आपले सरकार सेवा केंद्र, (ग्रामपंचायत व खासगी) तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्गमार्फत ई-के.वाय.सी.ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
--------------
हळदीचे नेरुर
शाळेस संगणक
दुकानवाड ः जिल्हा परिषद शाळा हळदीचे नेरुर क्र. १ ला ग्लोबल फाउंडेशन (पिंगुळी) यांच्याकडून संगणक देण्यात आला. फाउंडेशनचे विभागीय प्रमुख प्रसाद परब, स्वप्नील नाईक, उमेश गावडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रसिक परब, रवींद्र गुरव, पूजा परब, सीमा नाईक, गीतांजली कविटकर, जयवंत सावंत, मुख्याध्यापक म्हाडगूत, दत्ता धुरी, सौ. कारेकर उपस्थित होते.
--------
कर्मचारी संस्थेचे
सभासदांना आवाहन
ओरोस ः सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पतसंस्थेतर्फे गौरव करण्यात येणार आहे. ज्या सभासदांची मुले २०२२ मध्ये दहावी, बारावी तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये ६० टक्केपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत, अशा तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. आवश्यक माहिती १५ सप्टेंबरपूर्वी सादर करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भाग्यवंत वाडीकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88980 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..