कृषि विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन स्पोर्टेक्सचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषि विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन स्पोर्टेक्सचे उद्घाटन
कृषि विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन स्पोर्टेक्सचे उद्घाटन

कृषि विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन स्पोर्टेक्सचे उद्घाटन

sakal_logo
By

rat२१p१०.jpg
44670
रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टेक्सचे उद्घाटनप्रसंगी डॉ. विठ्ठल नाईक, डॉ. प्रकाश शिनगारे, संदीप थोरात, डॉ. दबीर पठाण, सुभाष शिरधनकर पहिल्या छायाचित्रात तर उपस्थित खेळाडू दुसऱ्या छायाचित्रात.
----------
आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टेक्सचे उद्घाटन
कोकण कृषि विद्यापीठ; बुद्धिबळ, बॅडमिंटन व टेबल टेनिसचे सामने
रत्नागिरी, ता. २१ : दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा स्पोर्टेक्समधील बुद्धिबळ, बॅडमिंटन व टेबल टेनिस या स्पर्धांचे उद्घाटन विद्यापीठाचे क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम संचालक डॉ. विठ्ठल नाईक यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे स्पर्धा सुरू आहेत. या खेळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाकडे आहे.
उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे, विद्यापीठ क्रीडा अधिकारी संदीप थोरात, मत्स्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दबीर पठाण, प्रमुख पाहुणे बुद्धिबळ राष्ट्रीय पंच सुभाष शिरधनकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. शिनगारे यांनी केले. अध्यक्ष डॉ. विठ्ठल नाईक यांनी या क्रीडा स्पर्धा आपल्या विद्यापीठ कुटुंबातील असून त्या चांगल्या वातावरणात पार पाडाव्यात असे आवाहन केले. यावेळी खेळाडूंना खेळांमध्ये प्रामाणिकता जोपासण्याबद्दलची शपथ देण्यात आली. या क्रीडा स्पर्धांमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या २८ महाविद्यालयांपैकी २० महाविद्यालयांनी भाग घेतला. यापैकी टेबल टेनिस खेळामध्ये मुलांचे १४, मुलींचे १२, बॅडमिंटनमध्ये मुलांचे २० मुलींचे १७ व बुद्धिबळामध्ये मुलांचे १८ व मुलींचे १५ संघ सहभागी झाले आहेत. सूत्रसंचालन डॉ. सुहास वासावे यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. उत्तम महाडकर डॉ. नाईक यांचे मत्स्य महाविद्यालयाला या क्रीडा स्पर्धाचे यजमानपद दिल्याबद्दल विशेष आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89036 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..