चिपळूण-बँकिंग सेवा देणारी मुंढर स्मार्टमध्ये अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-बँकिंग सेवा देणारी मुंढर स्मार्टमध्ये अव्वल
चिपळूण-बँकिंग सेवा देणारी मुंढर स्मार्टमध्ये अव्वल

चिपळूण-बँकिंग सेवा देणारी मुंढर स्मार्टमध्ये अव्वल

sakal_logo
By

-rat२१p१३.jpg
L४४६७३
- रत्नागिरी ः स्मार्ट ग्रामचा पुरस्कार स्वीकारताना मुंढर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी.
-------------
बँकिंग सेवा देणारे मुंढर स्मार्टमध्ये अव्वल

मान्यवरांकडून पुरस्काराचा स्वीकार; विशेष कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः गुहागर तालुक्यातील मुंढर ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम योजनेत गुहागर तालुक्यात अव्वल ठरली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी राबवलेली बॅंकिंग सेवा लक्षवेधी ठरली. याशिवाय ग्रामपंचायतीने पुढाकार घेत जीवनज्योती, प्रधानमंत्री सुरक्षा आणि अटल पेन्शन योजना प्रत्येक ग्रामस्थांपर्यत पोहोचली. या साऱ्या उपक्रमांची दखल घेत स्मार्ट ग्रामसाठी प्रथम क्रमाकांने उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे हस्ते मुंढर ग्रामपंचायतीस गौरवण्यात आले.
राज्य सरकारच्या आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत मुंढर ग्रामपंचायतीने विशेष कामगिरी केली. ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली पूर्ण केली. याशिवाय गावात सौर उर्जेचे दिवे, शोषखड्डे, रोजगार हमी योजनेतून वृक्षलागवड, लोकसहभागातून स्वच्छता अभियान आदी विविध उपक्रम राबवले. याशिवाय ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत राबविण्यात आलेला बँकिंग सेवा प्रकल्प विशेष उल्लेखनीय ठरला. या ग्रामपंचायतीला तत्कालीन गुहागरचे बीडीओ अमर भोसले यांचे मार्गदर्शन मिळाले. उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. मुंढरचे सरपंच सुशिल आग्रे, उपसरपंच प्रणिता रामाणे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, ग्रामसेवक सुरेश गोरे, सदस्य अमिषा गमरे, प्रदीप अवेरे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रभाकर शिर्के, पोलिस पाटील नीलेश गमरे, किरण धनावडे, माजी सरपंच अस्मिता अवेरे, विजय रामाणे व गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थांनी पुरस्कार स्वीकारला.
..
चौकट
२० कि.मी. ची पायपीट थांबली..
ग्रामपंचायतीतच बँकिग सेवा ग्रामस्थांना मिळतात. मुंढर मधील ग्रामस्थांना आपल्या खात्यातील पैसे काढणे, पैसे भरणे, अथवा बँक विषयक कोणतीही कामे केंद्रातच केली जातात. परिणामी बँकेच्या कामासाठी येथील ग्रामस्थांना १० ते २० कि.मी. ची पायपीट करावी लागत नाही. बँकेची सर्व कामे केंद्रामार्फत केली जातात. याशिवाय ग्रामपंचायतीने शासनाच्या विमा योजना प्रत्येक ग्रामस्थांपर्यत पोहोचवून त्याचा लाभ दिला आहे. यामध्ये जीवनज्योती सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तिन्ही योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89041 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..