निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आचऱ्यात उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निबंध, चित्रकला, वक्तृत्व 
स्पर्धा आचऱ्यात उत्साहात
निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आचऱ्यात उत्साहात

निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आचऱ्यात उत्साहात

sakal_logo
By

44683
आचरा ः विजेत्यांना गौरविल्यानंतर सरपंच टेमकर, उपसरपंच वायंगणकर, सुरेश गावकर आदी.

निबंध, चित्रकला, वक्तृत्व
स्पर्धा आचऱ्यात उत्साहात
आचरा, ता. २१ ः आचरा ग्रामपंचायत आयोजित निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांचा निकाल जाहीर झाला असून कनिष्ठ महाविद्यालय निबंध स्पर्धेत सिद्धी अपराज, चित्रकला स्पर्धेत वेदांत तवटे, वक्तृत्व स्पर्धेत सई घुटुकडे व निबंध स्पर्धेत श्रावणी पोटधन यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
माजी मुख्याध्यापक सुरेश गावकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविले. यावेळी सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, माजी मुख्याध्यापक सुरेश गावकर, उद्योजक जयप्रकाश परुळेकर, सुगंधी गुरव व सर्व सदस्य, इतर मान्यवर उपस्थित होते. गटवार निकाल असा ः निबंध स्पर्धा (विषय-माझा गाव-माझ्या विकासाच्या कल्पना)-सिद्धी अपराज, सुरभी त्रिंबककर, मयुरेश शिर्सेकर. चित्रकला स्पर्धा-वेदांत तवटे (आचरा हायस्कूल), जीवन मेस्त्री (हिर्लेवाडी शाळा), भार्गवी महाभोज (आचरा हायस्कूल), वक्तृत्व स्पर्धा-सई घुटूकडे (आचरा हायस्कूल), स्नेहल घाडी (केंद्रशाळा), मयुरेश धुरी (पिरावाडी शाळा), निबंध स्पर्धा-श्रावणी पोटधन (पिरावाडी), नुर्वी शेटये, नमिता वस्ते (बागजामडूल).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89042 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..