कुडाळात माजी सैनिकांसह गुणवंतांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात माजी सैनिकांसह गुणवंतांचा सन्मान
कुडाळात माजी सैनिकांसह गुणवंतांचा सन्मान

कुडाळात माजी सैनिकांसह गुणवंतांचा सन्मान

sakal_logo
By

swt२१२.jpg
४४६८१
कुडाळः हेल्प ग्रुपच्या वतीने माजी सैनिक महेंद्र कुडकर यांचा सन्मान करताना आमदार वैभव नाईक व मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळात माजी सैनिकांसह गुणवंतांचा सन्मान
हेल्प ग्रुपचा पुढाकारः गोकुळाष्टमी विविध कार्यक्रमांनी साजरी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः सलग १८ वर्षे सातत्य ठेवत २०० हुन अधिक सभासद असणाऱ्या हेल्प ग्रुप, कुडाळच्या वतीने पारंपरिक दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी विविध क्षेत्रातील यश प्राप्त, स्वातंत्र्य सैनिक आदींचा सन्मान करून गोकुळाष्टमी सोहळा दिमाखात साजरा केला.
दहीहंडी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विवेक पंडित, डॉ. संदीप पाटील, संजय कोरगावकर, अभिजीत परब, अजय सावंत प्रमुख उपस्थितीत होते. व्यासपीठाचे उद्घाटन कुडाळ पोलिस ठाण्याचे, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे हस्ते झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत महिला ढोलपथक सिंधुरत्न-वेतोरे यांनी विशेष महिला सक्षमीकरण या सदराखाली अप्रतिमरित्या सादरीकरण करून पारंपरिकता व सांस्कृतिक वारसा जपला. सांकृतिक कार्यक्रमाचे उद्धाटन नगराध्यक्ष आफरीन करोल, नगरसेवक गणेश भोगटे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, नीलेश परब, अॅड. राजीव कुडाळकर, राकेश कांदे, नेरूर सरपंच शेखर गावडे यांच्या हस्ते झाले.
नगरसेवक प्राजक्ता शिरवलकर, आनंद शिरवलकर, अक्षता खटावकर, शुभांगी काळसेकर, सोनल सावंत, उदय मांजरेकर, श्रेया गवंडे, किरण शिंदे, प्रसाद शिरसाट यांचे हस्ते कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. लकी ड्रॉ कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. आत्मरक्षणासह ऐतिहासिक वारसा जपणारे तुळसुली येथील छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळाचे लाठीकाठी, तलवारबाजी दांडपट्टा, मैदानी व साहसी खेळांचे सादरीकरण थक्क करणारे होते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या थिमचे उद्घाटन आमदार नाईक, हेल्प ग्रुपचे संदेश पारकर, संजय पडते, संजय भोगटे, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर, श्रीपाद तवटे यांच्या हस्ते करण्यात आले. सैनिकांबद्दल कृतज्ञता व राष्ट्रभक्ती सदराखाली माजी सैनिक राजेंद्र पास्ते, योगेश कुडाळकर, महेंद्र कुडकर, गणेश वझे यांचा सन्मान आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक तेजस्वीनी शिंदे यांच्या हस्ते ''पद्मश्री'' परशुराम गंगावणे, एअर फोर्स पायलट राफेल उडवणारे कुडाळमधील प्रज्वल कुळकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, राजन नाईक यांना सन्मानित केले. महिला पखवाज वादक श्रेया धुरी, शिवप्रेमी संघटना, रमा नाईक, अक्षय प्रभू, ओंकार वाळके, किरण कुडाळकर, प्रथमेश शंकर यांना गौरविण्यात आले. अंकिता घावनळकर, ''युवा फोरम भारत''चे संस्थापक यशवर्धन राणे यांची युनिसेफ इंडिया संस्थेवर युवा सल्लागार म्हणून निवड झाल्याबद्दल, हेल्प ग्रुप सदस्य मनोज वालावलकर यांची देशाची शिखर संघटना ऑल इंडिया मोटर ट्रासपोर्ट कांग्रेस (नवीदिल्ली) या संस्थेवर स्पेशल परमेन्ट इन्व्हाइटी व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमस इंडस्ट्रिज अँण्ड अॅग्रीकल्चर जीसी मेंबर्स म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मान केला. ''ढ'' ग्रुपच्या पूर्ण टीमचा तसेच कुडाळ ते कन्याकुमारी असा सायकलने प्रवास पूर्ण केलेले रुपेश तेली, अमित तेंडुलकर, शिवप्रसाद राणे यांचा सत्कार केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89046 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..