कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा
कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा

कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा

sakal_logo
By

swt213.jpg मध्ये फोटो आहे.
44682
कणकवलीः ‘कौशल्य भारत कुशल भारत’ कार्यक्रमात बाबल नांदोसकर यांचे स्वागत करताना संतोष नेवरेकर व मान्यवर.

कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा
बाबल नांदोसकर ः कणकवलीत ‘कौशल्य भारत’ कार्यक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ. ता. २१ः बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक कामगाराने घेतला पाहिजे. त्यासाठी संघटनेकडून निश्चितच सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले.
महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत कामगारांसाठी ‘कौशल्य भारत कुशल भारत’ अतंर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कणकवली यांच्या सहकार्याने कौशल्य भारत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर, युवामित्र प्रशिक्षक उत्तम मुंबरकर, डेप्युटी विभागीय अमोल गुराम, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कणकवली संचालक संतोष नेवरेकर, तालुका कणकवली समनव्यक विठ्ठल हुंबळकर, बांधकाम कामगार संघाचे बाप्पा पाताडे आदींसह कामगार वर्ग उपस्थित होता.
जिल्हाध्यक्ष नांदोसकर यांनी कामगार यांना भविष्यात उद्भवणारी संकटे व कामगारांची पुढील वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले. गेली दोन वर्षे कोरोना महामारी संकटामुळे बांधकाम कामगारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. बांधकाम कामगारांचे प्रश्‍न शासन दरबारी सुटावेत, यासाठी संघटनेच्या माध्यमातून राज्याचे कामगार मंत्री, खासदार, पालकमंत्री, आमदार यांचे लक्ष वेधले. त्यांच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न मार्गी लागत असून हे निश्चितच कामगारांसाठी कौतुकास्पद आहे. बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना समजावून घेऊन त्यांचा लाभ कसा मिळेल, यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. त्यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा आहे. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. संघटितपणा फार महत्त्वाचा आहे, असे नांदोसकर म्हणाले. यावेळी बांधकाम क्षेत्रातील अनेक प्रश्न ऑनलाइन मार्गदर्शन तसेच नोंदणी याबाबत माहिती देण्यात आली. संतोष नेवरेकर यांनी कामगार कल्याण केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89047 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..