सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री चव्हाण यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी
घेतली मंत्री चव्हाण यांची भेट
सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री चव्हाण यांची भेट

सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री चव्हाण यांची भेट

sakal_logo
By

swt२१११.jpg
४४६७६
मुंबईः मंत्री रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा देताना महेश सारंग. बाजुला सुधीर आडिवरेकर, परिमल नाईक, उदय नाईक.

सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी
घेतली मंत्री चव्हाण यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची सावंतवाडीतील भाजपा पदाधिकाऱी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवेक सुधीर आडिवरेकर, अॅड. परिमल नाईक, उदय नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी विकासकामे, निवडणुका, संघटनात्मक बांधणीसह विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकांत भाजपला स्वबळावर लढायचे आहे. शतप्रतिशत भाजपसाठी सगळ्या निवडणुका जिंकायच्या आहेत. त्याकरीता ताकदीने मेहनत घ्या, लागेल ती मदत करू, असा शब्दही मंत्री चव्हाण यांनी पदाधिकांऱ्यांना दिला. यावेळी झालेल्या चर्चेत मुंबई-गोवा महामार्ग २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठीच नियोजन केले आहे. त्यामुळे मुंबई अन् कोकण प्रवास गतीमान होणार आहे. आडाळी एमआयडीसीत उद्योगासह कंपन्या आणून स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार संधी उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.
भाजपकडून जिल्ह्यात करण्यात आलेल्या ९१६ बुथ रचनेबाबत महेश सारंग यांनी माहिती दिली. यावेळी शक्तिकेंद्रप्रमुख,‌ बुथप्रमुखांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी केली असता लवकरच तशी बैठक घेण्याचे मंत्री चव्हाण यांनी मान्य केले.
दुग्ध व्यवसायिक, कुक्कुटपालन व्यवसायिक आदींना सक्षम करण्यासाठी शासन अन् जिल्हा बँक यांच्या माध्यमातून मदत केली जाईल. भात खरेदी-विक्री केंद्रातून साडे सहा कोटी बोनस शेतकऱ्यांना येण आहे. हा बोनस येत्या काही दिवसांत जमा होईल, असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिल्याची माहिती जिल्हा बँक संचालक सारंग यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89048 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..