चिपळूण-परशुराम घाटात 24 तास आपत्कालीन यंत्रणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-परशुराम घाटात 24 तास आपत्कालीन यंत्रणा
चिपळूण-परशुराम घाटात 24 तास आपत्कालीन यंत्रणा

चिपळूण-परशुराम घाटात 24 तास आपत्कालीन यंत्रणा

sakal_logo
By

-rat२१p१५.jpg
44692
- चिपळूण ः परशुराम घाटात विविध ठिकाणी पोलिस विभागाने असे चेकपोस्ट उभारले आहे.
---------------
परशुराम घाट--लोगो
-------------
घाट प्रवास खडतर; यंत्रणेची होणार कसरत

यंत्रणा तैनात २४ तास; गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्याही सूचना, आपत्कालीन यंत्रणा सज्ज
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः आगामी गणेशोत्सव कालावधीत परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परशुराम घाट परिसरातच आपत्कालीन यंत्रणा आणि मनुष्यबळ २४ तास कार्यरत झाली आहे. पाऊस अद्याप सुरू असून वाहतूक कोंडी, दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असल्याने येथील परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. घाटात जागोजागी पोलिसांचे चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. घाटात एखाटी घडली तर त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यासाठी तसेच वाहनांचा मार्ग बदलण्यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.
पावसामुळे पडलेले प्रचंड खड्डे आणि डोंगर कटाईमुळे धोकादायक झालेला परशुराम घाट यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस धोकादायक झाला आहे. खेडपासून लांज्यापर्यंतचा प्रवास खड्ड्यातून करावा लागत आहे. चिपळूण, संगमेश्वर पट्ट्यात तर प्रचंड खड्डे पडल्याने येथून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने परशुराम घाटात अधिक सतर्कता बाळगून २४ तास यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
धोकादायक असलेला परशुराम घाटातील वाहतूक आणि गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका आठवड्यात खड्डे बुजविण्याचे मोठे आव्हान संबंधित यंत्रणेसमोर आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाट ते चिपळूण दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवनिमित्त कोकणात येणाऱ्यांचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे. रेल्वे गाड्यांचे तिकीट उपलब्ध होत नसून एसटीचेही आरक्षण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी बसने आणि वैयक्तिक वाहन घेऊन कोकणात येणाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. या सर्वांना मात्र कोकणात महाड, पळस्पे, कशेडी, चिपळूण या पट्ट्यात मोठया प्रमाणात खड्डे आहेत. या भागातून होणारी वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महामार्ग पोलिसांना करावा लागणार आहे.
-------------
चौकट
खड्डेमुक्त रस्ता दाखवा
कशेडी घाट, पोलादपूर सडवली नदी पूल ते खवटी अनुसया हॉटेलपर्यंत, भरणे नाका खेड येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस खड्डे पडले आहेत. चिपळूणमध्ये परशुराम घाट, बहादूरशेख नाका ते चिपळूण पॉवर हाऊस, आरवली एसटी स्थानक, संगमेश्वर ते बावनदी या दरम्यान खड्डे पडले आहेत.
----------
कोट
गणेशोत्सवकाळात कोकणात मोठय़ा संख्येने रस्तेमार्गे वाहने येतात. मार्गावरील प्रवास सुरळीत राहण्यासाठी महामार्ग पोलीस अधीक्षक, तसेच रस्त्यांशी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. महामार्ग पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश देतानाच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना २७ ऑगस्टपूर्वी खड्डे बुजवण्याचे आणि अन्य कामे वेळत पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
-शेखर निकम, आमदार, चिपळूण
..
चौकट
एकच झुंबड उडणार..
दरवर्षी गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई, ठाणे आणि उपनगरातील चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांची एकच झुंबड उडणार आहे.
..
चौकट
महामार्ग पोलिसांसमोर आव्हान..
चिपळूण येथे खड्डे भरण्याचे काम सुरू असताना शनिवारी एकाचा बळी गेला. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील नागरिक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान महामार्ग पोलिसांसमोर आहे.
....
एक नजर..
प्रचंड खड्डे आणि डोंगर कटाईमुळे घाट धोकादायक
खेडपासून लांज्यापर्यंतचा प्रवास होतोय खड्ड्यातून
चिपळूण, संगमेश्वर पट्ट्यात रस्त्यावर प्रचंड खड्डे
घाटात अधिक सतर्कता; २४ तास यंत्रणा कार्यान्वित
कशेडी घाट ते चिपळूण दरम्यान मोठमोठे खड्डे
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास खडतर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89057 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..