दोडामार्गमध्ये धोकादायक खांब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्गमध्ये धोकादायक खांब
दोडामार्गमध्ये धोकादायक खांब

दोडामार्गमध्ये धोकादायक खांब

sakal_logo
By

दोडामार्गमध्ये धोकादायक खांब
दोडामार्ग, ता. २१ ः दोडामार्ग तालुक्यात एका संस्थेने रस्त्यालगत टाकलेल्या खांबामुळे धोका व अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे खांब सुरक्षितस्थळी लावावेत, अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे की, एका संस्थेद्वारे इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी बांदा ते दोडामार्ग परिसरात व तालुक्यात आवश्यक खांब अगदी रस्त्यालगत उभारून नियमबाह्य काम केले आहे. या कामामुळे रस्त्याची बाजुपट्टी देखील कमकुवत झाली आहे. यासाठी आवश्यक साहित्य काही ठिकाणी झाडावर लटकवून ठेवले आहे. हा सर्व प्रकार वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे आठ दिवसांत हे खांब काढून सुरक्षित ठिकाणी लावावे. अन्यथा ग्रामस्थांसह उपोषणास बसू, असा इशारा नाईक यांनी दिला. यावेळी मणेरीचे माजी सरपंच आत्माराम नाईक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89080 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..